संविदणे येथे आणेवारीचे काम सांगण्याच्या बहाण्याने महिलेचा विनयभंग केल्याची तक्रार; शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल
शिरूर | पुणे ग्रामीण Rjnews27 मराठी
शिरूर तालुक्यातील संविदणे येथे आणेवारीचे काम कसे पूर्ण करायचे, हे सांगण्याच्या बहाण्याने महिलेच्या शेजारी बसून तिच्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सुभाष नाथा कामठे (रा. संविदणे, ता. शिरूर, जि. पुणे) याच्याविरुद्ध महिलेने तक्रार दिली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १६ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास संविदणे गावच्या हद्दीत घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. संविदणे ते कवठे येमाई या रस्त्याच्या डाव्या बाजूस असलेल्या शिंदे मळा येथील पर्णकुटीत हा प्रकार घडल्याचे फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे.
आणेवारीचे काम कशा पद्धतीने पूर्ण करायचे, हे सांगण्याच्या बहाण्याने आरोपीने फिर्यादी महिलेच्या शेजारी बसून तिच्याशी गैरवर्तन केले. तसेच, तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेप्रकरणी संबंधित महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे
जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560







