भरधाव चारचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू; एक जखमी मुंजाळवाडीतील अष्टविनायक मार्गावरील अपघात; धडकेनंतर वाहनचालक घटनास्थळावरून फरार

भरधाव चारचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू; एक जखमी मुंजाळवाडीतील अष्टविनायक मार्गावरील अपघात; धडकेनंतर वाहनचालक घटनास्थळावरून फरार

Rjnews27 मराठी – शिरूर 

शिरूर : मौजे मुंजाळवाडी, ता. शिरूर येथील मलठण ते कवठेयमाई अष्टविनायक मार्गावर जिल्हा परिषद शाळेजवळ भरधाव चारचाकीने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोघांना धडक दिल्याची गंभीर घटना २९ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात संतोष शंकर मुंजाळ यांचा मृत्यू झाला असून सबाजी भागा मुंजाळ हे जखमी झाले आहेत.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारुती सुझुकी स्विफ्ट कार क्रमांक एमएच-०४-एफझेड-७७७० ही वैभव ढोमे, रा. पिंपरखेड, ता. शिरूर यांच्या ताब्यात होती. संबंधित वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालविताना मुंजाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळील स्पीड ब्रेकरवर वेग कमी न करता रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या संतोष शंकर मुंजाळ व सबाजी भागा मुंजाळ यांना धडक दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

 

या धडकेत संतोष शंकर मुंजाळ यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला, तर सबाजी भागा मुंजाळ हे जखमी झाले. अपघातानंतर वाहनचालकाने जखमींना घटनास्थळी सोडून अपघाताची माहिती न देता वाहनासह तेथून निघून गेल्याचे तक्रारीत नमूद आहे.

 

या घटनेप्रकरणी पांडुरंग बबन मुंजाळ, वय ४९ वर्षे, व्यवसाय शेती, रा. मुंजाळवाडी, कवठेयमाई, ता. शिरूर, जि. पुणे यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनचालकाबाबत पुढील तपास सुरू आहे.

 

सदर घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल भागवत करीत आहेत. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलीस हवालदार गवळी, ब.नं. २२७१ यांनी केली असून शिरूर पोलीस ठाण्याकडून पुढील तपास सुरू आहे.

संपादक - रमेश मनोहर बनसोडे
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे

जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *