आंधळगावात पत्र्याच्या शेडआड दारूविक्रीचा प्रकार उघड; शिरूर पोलिसांकडून ३,५९० रुपयांचा मुद्देमाल जप्त

आंधळगावात पत्र्याच्या शेडआड दारूविक्रीचा प्रकार उघड; शिरूर पोलिसांकडून ३,५९० रुपयांचा मुद्देमाल जप्त

Rjnews27 मराठी – रमेश बनसोडे

शिरूर : आंधळगाव परिसरात अवैधरित्या देशी-विदेशी दारूची विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर शिरूर पोलिसांनी कारवाई करत एका इसमाला ताब्यात घेतले. आंधळगाव ते ऊर्जा डेअरी रस्त्याच्या कडेला पत्र्याच्या शेडच्या आडोशाला ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत विविध प्रकारच्या दारूच्या बाटल्या असा एकूण ३ हजार ५९० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

 

२८ सप्टेंबर रोजी दुपारी १२.१० वाजण्याच्या सुमारास सचिन अनिल पवार हा आंधळगाव येथील रस्त्यालगत दारू विक्री करताना पोलिसांना आढळून आला. त्याच्याकडे दारू विक्रीचा परवाना नसतानाही विक्रीच्या उद्देशाने देशी व विदेशी दारूचा साठा ठेवण्यात आल्याचे तपासात समोर आले.

 

पोलिसांनी केलेल्या कारवाईत नीलिमापाच्या टॅंगो पंच देशी दारूच्या ११ बाटल्या, इम्पेरियल ब्लू विदेशी दारूच्या सहा बाटल्या आणि क्लासिक गोल्ड विदेशी दारूच्या दहा बाटल्या जप्त करण्यात आल्या. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत ३ हजार ५९० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित इसमाविरुद्ध यापूर्वीही दारूबंदीशी संबंधित गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, त्याच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाईदेखील करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या पुढील तपासाकडे लक्ष लागले आहे.

 

फिर्यादी पोलीस अंमलदार अमोल शंभू देवमाने यांनी याबाबत तक्रार दिली असून, तपास श्रेणी पोलीस उपनिरीक्षक आर. बी. कदम करीत आहेत. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलीस हवालदार वाडेकर यांनी केली.

संपादक - रमेश मनोहर बनसोडे
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे

जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *