विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी साखळी उपोषण आंदोलनाचा पहिला दिवस यशस्वी!
प्रतिनिधी – शाम जगताप
सासवड | जुलै २०२६
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडित NEET परीक्षा प्रकरणातील पारदर्शक व निष्पक्ष चौकशी व्हावी, या प्रमुख मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुरंदर तालुक्याच्या वतीने सासवड नगरपालिका समोर आयोजित करण्यात आलेल्या साखळी उपोषण आंदोलनाच्या पहिल्या दिवसाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या आंदोलनाचे नेतृत्व तालुकाप्रमुख श्री. अभिजित मधुकर जगताप यांनी केले. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कोणतीही तडजोड होऊ नये, परीक्षा प्रक्रियेवरील विश्वास अबाधित राहावा आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी ठाम भूमिका यावेळी मांडण्यात आली.
या आंदोलनाला ज्येष्ठ समाजवादी श्री. रावसाहेब अण्णा पवार, साहित्य परिषदेचे श्री. देशमुख, बी.एम.सी.सी. महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य श्री. वसंत धिवार यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला.
तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख श्री. उल्हास तात्या शेवाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्री. माणिकमामा झेंडे पाटील, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, अठरा पगड बारा बलुतेदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब भांडवलकर, प्रदेशाध्यक्ष राहुल काका भोंडे, मार्गदर्शक दिलीप गुरव, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजीराजे जगताप, राजाभाऊ शिरसागर, सचिन आढाळगे, संतोष भोंगळे, आतिश जगताप, महेश जगताप,तसेच विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, पत्रकार, पालक, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकरी संघटना, राष्ट्रसेवा दल, मराठा क्रांती मोर्चा, परिवर्तन क्रांती सेना, आणि इतर सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनीही आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला.
यावेळी विविध संस्थांचे शिक्षक, विद्यार्थी, शिक्षिका जयश्री शिंदे तसेच विद्यार्थिनी ऐश्वर्या भुजबळ यांनी विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आपले मनोगत व्यक्त केले.
पहिल्या दिवसाचे साखळी उपोषणकर्ते म्हणून श्री. अभिजित मधुकर जगताप आणि श्री. लक्ष्मण झुरंगे यांनी दिवसभर उपोषण करून विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या लढ्याला बळ दिले.
विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न हा कोणत्याही पक्षापेक्षा मोठा असून, या आंदोलनाला समाजातील सर्व स्तरांतून मिळालेला प्रतिसाद हा शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकतेसाठी आणि विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी सुरू असलेल्या लढ्याला नवी ताकद देणारा ठरला.
विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत हा लोकशाही मार्गाने सुरू असलेला लढा कायम राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.




