वडगाव रासाई येथे दुर्दैवी दुचाकी अपघात; शेतात जाताना गाडी घसरून 49 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

शिरूर, प्रतिनिधी : शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई येथे शेतात जात असताना झालेल्या दुर्दैवी दुचाकी अपघातात 49 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूबाबत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 एप्रिल 2026 रोजी सकाळी सुमारे 9.30 वाजण्याच्या सुमारास वडगाव रासाई गावाच्या हद्दीत नवनाथ अकुंश जगताप (वय 49, रा. वडगाव रासाई, ता. शिरूर) हे आपल्या शेतात जाण्यासाठी होंडा युनिकॉर्न (क्र. MH-12 PV-5893) या दुचाकीवरून निघाले होते.

संतोष मगर यांच्या घरासमोर अचानक एक कुत्रा दुचाकीसमोर आल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी घसरली. या अपघातात नवनाथ जगताप हे रस्त्यावर पडल्याने त्यांच्या बरगड्या व गुडघ्याला गंभीर तसेच किरकोळ दुखापत झाली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर त्यांचा मुलगा कल्पेश नवनाथ जगताप (वय 19, रा. वडगाव रासाई) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक 626/2026 नोंद करण्यात आला आहे.

या प्रकरणात कोणतीही अटक करण्यात आलेली नाही. तसेच कोणतेही वाहन, हत्यार किंवा इतर माल जप्त करण्यात आलेला नाही. आरोपीचा पूर्व गुन्हेगारी इतिहास अथवा प्रतिबंधात्मक कारवाईची नोंदही नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार गवळी हे करत असून, दाखल अंमलदार म्हणून पोलीस हवालदार खबाले यांनी कार्यवाही केली आहे. शिरूर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *