भारतीय शेतकऱ्यांसाठी संकटाचा इशारा! खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा सरकारला प्रश्न!!!!

संपादक – रमेश बनसोडे
नुकत्याच झालेल्या सत्तांतरानंतर भारताने कृषी बाजारपेठ अमेरिकेसाठी खुली करावी, असे मत व्यक्त करण्यात आले आहे. मात्र, यामुळे भारतीय शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहू शकते. केंद्र सरकारने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका घेतलेली नाही.
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी संसदेत सरकारला लक्ष्य करत म्हटले की, अमेरिकन सोयाबीन उत्पादन हे भारतीय उत्पादनाच्या दुप्पट आहे. याशिवाय, अमेरिकन शेतकऱ्यांना जेएम (GM) बियाणे वापरण्याचा अधिकार आहे, जो भारतीय शेतकऱ्यांना नाही. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी त्वरित पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली.
पीक विमा योजना म्हणजे कंपन्यांसाठी फायद्याचा सौदा?
प्रधानमंत्री पीक विमा योजनेवर जोरदार टीका करत डॉ. कोले म्हणाले की, मागील वर्षी विमा कंपन्यांनी १०,००० कोटी रुपये कमावले, मात्र नुकसान भरपाईसाठी फक्त ६५० कोटी रुपयेच वितरित करण्यात आले. ही योजना शेतकऱ्यांसाठी नसून विमा कंपन्यांच्या फायद्यासाठी असल्याचा आरोप त्यांनी केला.
नदी संवर्धन आणि जलसंधारणाची गरज
पंतप्रधानांनी ‘नदी उत्सव’ साजरा करण्याचे आवाहन केले असले, तरी खरे समाधान तेव्हाच मिळेल जेव्हा नद्यांचे पुनरुज्जीवन, खोलिकरण आणि रुळविकरण होईल, असे मत खासदार कोले यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची आत्महत्या आणि कर्जमाफीचा मुद्दा
महाराष्ट्रात सातत्याने शेतकरी आत्महत्या करत आहेत, मात्र सरकार अजूनही प्रभावी कर्जमाफी देऊ शकलेले नाही. निवडणुकीपूर्वी सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, पण प्रत्यक्षात बँकांनी त्यांच्यावर अधिक कर्जफेडीचा दबाव आणल्याचा आरोपही त्यांनी केला.
सरकारच्या कृषी धोरणांवर गंभीर प्रश्नचिन्ह
सरकार एका बाजूला ‘आत्मनिर्भर भारत’ ची भाषा करत आहे, तर दुसऱ्या बाजूला ६ लाख मेट्रिक टन कडधान्ये आयात करत आहे. मग, सरकार भारतीय शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करायचे आहे की परदेशी शेतकऱ्यांना मदत करायची आहे? असा थेट सवाल खासदार कोले यांनी केला.
शेती उत्पादनासाठी पायाभूत सुविधा आणि बाजारभाव सुधारण्याची गरज
देशातील शेतकऱ्यांना पुरेसे पाणी, चांगली बियाणे आणि योग्य बाजारभाव मिळणे आवश्यक आहे. मात्र, सध्या दलाल आणि मध्यस्थांमुळे शेतकऱ्यांना तोट्यात शेती करावी लागत आहे. त्यामुळे सरकारने त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी त्यांनी केली.
‘राजकीय मुद्द्यांवर भांडू नका, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्या!’
सरकारकडून सतत राजकीय वाद उभे केले जात आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या हितासाठी कुणीही विचार करत नाही. ‘मस्जिद के नीचे मंदिर क्यों ढूंढते हो? इतिहास पर क्यों लढ़ते हो? किसानो के हित में इंसानियत की बात कर!’ असा मार्मिक सल्लाही खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिला.




