न्हावरे येथे श्रीनाथ म्हस्कोबा व खोरचा म्हस्कोबा देवांचा अभिषेक उत्साहात संपन्न; धार्मिक विधींसह छबिना सोहळ्याने परिसर भक्तिमय

विजय कांबळे – प्रतिनिधी

न्हावरे : न्हावरे येथील श्रीनाथ म्हस्कोबा व खोरचा म्हस्कोबा देवांचा धार्मिक अभिषेक सोहळा भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडला.  सकाळी दहा वाजता दोन्ही देवांचा विधिवत अभिषेक करण्यात आला. त्यानंतर सायंकाळी देवांना आकर्षक पोषाख परिधान करून फुलांची सुंदर सजावट करण्यात आली होती. मंदिर परिसरात रेखीव रांगोळ्या काढण्यात आल्याने संपूर्ण परिसराला धार्मिक आणि उत्सवी स्वरूप प्राप्त झाले होते.

रात्री आठ वाजता श्रीनाथ म्हस्कोबा देवांची धुपारती झाल्यानंतर पारंपरिक छबिना काढण्यात आला. यावेळी फटाक्यांच्या आतषबाजीने परिसर दुमदुमून गेला. मानकरी व पंचकरी यांनी देवांच्या आरत्या ओवाळून भक्तिभाव व्यक्त केला, तर छबिन्यात सहभागी झालेल्या भाविकांनी नृत्याचा आनंद घेतला. यानिमित्ताने देवांना पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. परिसरातील महिला, युवक, ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहून या धार्मिक सोहळ्यात सहभागी झाले होते. पारंपरिक धार्मिक विधी आणि भक्तांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

संपादक - रमेश मनोहर बनसोडे
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे

जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *