भांबर्डे येथे शिक्षण परिषदेत सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान
प्रतिनिधी – विवेकानंद फंड
रांजणगाव गणपती केंद्रातील भांबर्डे जिल्हा परिषद शाळेत नुकतीच शिक्षण परिषद संपन्न झाली यावेळी मूल्यवर्धन या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. श्री सय्यद सर व चोले सर व केंद्र प्रमुख तानाजी पाटील सर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा परिषद शाळा भांबर्डे येथील मुख्याध्यापक नानाभाऊ नाणेकर यांचा सेवानिवृत्ती निमित्त शाल, श्रीफळ, फेटा व मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी रांजणगाव केंद्रातील नाथा वीर ,सरला फुंदे मॅडम ,स्मिता कुलकर्णी मॅडम यांचाही सेवानिवृत्ती निमित्त सत्कार करण्यात आला. यावेळी केंद्रातील सर्व शिक्षक उपस्थित होते. भांबर्डे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री पवार, माजी सरपंच गोरख मस्के, पोलीस पाटील, केंद्रप्रमुख तानाजी पाटील, ग्रामस्थ, शाळा समिती पदाधिकारी, संगीता पळसकर मुख्याध्यापक, नामदेव गायकवाड मुख्याध्यापक, भांबर्डे येथील ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते . केंद्रप्रमुख तानाजी पाटील सर व शाळा व्यवस्थापन समिती भांबर्डे यांच्या हस्ते चारही मान्यवरांचा सन्मान करण्यात आला यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केली. यावेळी श्री संतोष शेवाळे ,नामदेव गायकवाड,सौ विजया तळोले, शर्मिला निचीत , श्री पावशे सर , पोलीस पाटील शेवाळे ,श्री आप्पासाहेब देशमुख यांनी आपली मनोगत व्यक्त केली .सत्कारमूर्ती म्हणून श्री नाणेकर व नाथा वीर यांनीही आपले सेवाकाळातील अनुभव सांगितले व प्रामाणिक सेवा केली तर त्याचे फळ निश्चित मिळते असे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्जुन निचीत सर यांनी केले तर आभार श्री संजयकुमार वाळके सर यांनी मानले.
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे
जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560






