*नगर-पुणे हाय वे वाहतूक कोंडीच्या विरोधात खंडाळे ग्रामस्थ आक्रमक : रस्ता रुंदीकरणासह दुरूस्ती ची मागणी* नगर पुणे हायवे वरती

*नगर-पुणे हाय वे वाहतूक कोंडीच्या विरोधात खंडाळे ग्रामस्थ आक्रमक : रस्ता रुंदीकरणासह दुरूस्ती ची मागणी* नगर पुणे हायवे वरती

 सह्याद्रीचा आवाज करिता -विवेकानंद फंड 

वाहतूक कोंडी ही समस्या नित्याचीच झालेली आहे. सणासुदीच्या काळात ऐन दिवाळीच्या धामधुमीमध्ये लाखो प्रवासी नगर पुणे हायवे वरती प्रवास करतात.तसेच दैनंदिन वाहतूक कोंडीचा फटका वाहनांना बसू नये म्हणून कोंढापुरी कडून रांजणगाव कडे जाताना खंडाळे माथ्यावरून गावांमध्ये जाऊन पिंपरी दुमाला रस्त्याने जाऊन पुढे रांजणगाव कडे प्रवास करत वाहनांची वर्दळ खंडाळे गावामध्ये प्रचंड वाढलेली आहे. सदरील रस्ता हा खंडाळे गावांमधून तसेच खेडकर वस्तीच्या मधोमध असल्याने ग्रामस्थांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो आहे.खंडाळे गावचा हायवेला जोडलेला रस्ता हा अरुंद खड्डेमय व प्रचंड अडचणीचा बनलेला आहे. हायवे आॅथोरिटी कडून सदरील रस्ता सर्विस रोड म्हणून वापरण्यात येतो आहे. रस्त्याला साईट पट्ट्या नाही व खड्डेमय रस्ता असल्याने दैनंदिन चाकरमाने , जेष्ठ नागरिक, महिला, शाळकरी मुले,खंडाळे ग्रामस्थांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात जड वाहतूकही या रस्त्याने होते आहे. खंडाळे ग्रामस्थांनी या वाहतूक कोंडीचा फटका बसत असून ग्रामस्थ प्रचंड आक्रमक झाले असून विशेष ग्रामसभा घेऊन रास्ता रोको करण्याच्या तयारीत आहेत. तरी सदरील प्रशासनाने तातडीने रस्ता दुरुस्त करून वृद्धीकरणासह साईट पट्ट्या भरून भक्कम रस्ता बनविण्यात यावा व जड वाहतुकीवर तुर्तास बंदी घालावी.अशी आग्रही मागणी समस्त खंडाळे ग्रामस्थांनी प्रशासन व नगर पुणे हायवे आॅथोरेटी केली आहे.

संपादक - रमेश मनोहर बनसोडे
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे

जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *