दिवाळीनिमित्त ग्रामपंचायत रांजणगाव गणपतीच्या कर्मचाऱ्यांना बोनस, मिठाई व कपड्यांचे वाटप
सह्याद्रीचा आवाज करिता – विवेकानंद फंड
रांजणगाव गणपती : दिपावली सणाचे औचित्य साधून ग्रामपंचायत रांजणगाव गणपतीच्या वतीने ग्रामपंचायतीतील सर्व कर्मचाऱ्यांना दरवर्षीप्रमाणे दिवाळी बोनस, मिठाई व कपड्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी उपस्थित ग्रामपंचायतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. वर्षभर ग्रामपंचायतीच्या विविध कामांमध्ये कर्मचारी प्रामाणिकपणे व जबाबदारीने आपले कर्तव्य पार पाडत असतात. त्यांच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने दिवाळीनिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक करत त्यांना सुख, समृद्धी व उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच कर्मचाऱ्यांनी दिवाळीनिमित्त बोनस, मिठाई व कपड्यांच्या माध्यमातून आपली दिवाळी गोड केल्याबद्दल ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी व प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानले.
यावेळी लोकनियुक्त सरपंच सौ. सुवर्णाताई वायदंडे, उपसरपंच सौ नम्रताताई शिंदे, ग्रामपंचायत सदस्य श्री श्रीकांत पाचुंदकर पाटील, श्री आत्माराम खेडकर,श्री अशोक शेळके, श्री नेताजी फंड, श्री हर्षल गदादे, सौ यमुनाबाई खेडकर, सौ शोभाताई शेळके, सौ शितलताई पंचमुख, तसेच श्री दिनेश लांडे, श्री रमेश शेळके, श्री ज्ञानेश्वर वायदंडे,ग्रामपंचायत अधिकारी श्री राजाराम रासकर तसेच ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे
जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560







