आमदाबादच्या शिक्षकांची एस.टी.कर्मचाऱ्यांसोबत दिवाळी…✨✨✨✨
सह्याद्रीचा आवाज करिता – विवेकानंद फंड
दिवाळी सणाचे औचित्य साधून,दिपावलीच्या पुर्वसंध्येला मा.पांडुरंगआण्णा थोरात माध्यमिक विद्यालय, आमदाबाद या शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शिरुर एस. टी.डेपोत जाऊन तेथील अधिकारी व चालक,वाहक यांना मिठाईचे वाटप करून त्यांना दिवाळीनिमित्त शुभेच्छा दिल्या.
“प्रवाशांच्या सेवेसाठी”हे ब्रीदवाक्य असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एस.टी.ची ही ‘लालपरी’ खऱ्या अर्थाने ग्रामीण जनतेची जीवनवाहिनी मानली जाते, आणि त्यामागे सर्वात मोठी मेहनत असते ती प्रत्यक्षात काम करणाऱ्या चालक आणि वाहक यांची.या कर्मचाऱ्यांना आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करता येत नाही हीच गरज ओळखून आणि या सर्वांप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी विद्यालयातर्फे दरवर्षी हा उपक्रम राबविला जातो.
या भेटीदरम्यान आमदाबाद ग्रामपंचायतचे आदर्श सरपंच श्री.प्रकाशराव थोरात,श्री.कोळपे साहेब, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.स्वातीताई थोरात मॅडम, सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनी उपस्थित होते तर शिरूर डेपोच्या आगार प्रमुख श्रीमती मनिषा गायकवाड, आगार व्यवस्थापक श्री.दळवी साहेब, वाहतूक नियंत्रक श्री.लंके साहेब, लिपिक श्री.उगले, लिपिक श्री.झगडे, कंट्रोलर श्रीमती.मुरकुटे,गुरव,पिंपळे, मावळे, रासकर,खोडदे,माने, म्हस्के,मते, राऊत, चव्हाण, कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
दिवाळीपूर्वी शाळेने आपली दिवाळी गोड केल्यामुळे उपस्थित अधिकारी व कर्मचारी भावनिक झाले होते.काही कर्मचाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना या उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले व शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रवासादरम्यान असणाऱ्या शिस्तीचे विशेष कौतुक केले.शेवटी शाळेच्या वतीने सरपंच श्री.प्रकाशराव थोरात यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या व चहापानानंतर या गोड कार्यक्रमाची सांगता झाली.🎁🎁🎁🎁🎁🎉🎉🎉🎉🎈🎈🎈
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे
जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560






