स्टेट बँक कॉलनीतून ७० हजारांची होंडा स्कूटर चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध शिरूर पोलिसांत गुन्हा
सह्याद्रीचा आवाज करिता -बालाजी कांबळे
शिरूर : शिरूर शहरातील गोलेगाव रोड परिसरातील स्टेट बँक कॉलनी येथून सुमारे ७० हजार रुपये किमतीची होंडा कंपनीची मोटार स्कूटर अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरातील वाहनधारकांमध्ये चिंता व्यक्त होत असून, चोरीच्या घटनांना आळा घालण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत बाळासाहेब भागवत (वय ३२, रा. स्टेट बँक कॉलनी, गणेशनगर, शिरूर) यांनी त्यांची काळ्या रंगाची होंडा मोटार स्कूटर (क्रमांक एमएच-१२-झेडजे-८३४७) कमलपार्क बिल्डिंगशेजारील लॉन्ड्री दुकानासमोर उभी केली होती. दिनांक १ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ७ वाजल्यापासून रात्री ९.३० वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात व्यक्तीने सदर स्कूटर चोरून नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
स्कूटर चोरीस गेल्याचे लक्षात आल्यानंतर भागवत यांनी परिसरात शोध घेतला. मात्र, स्कूटरचा ठावठिकाणा लागला नाही. त्यानंतर त्यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार खेडकर (ब.नं. ३३२८) करीत आहेत. परिसरातील नागरिकांनी आपल्या वाहनांच्या सुरक्षेबाबत अधिक दक्षता घेण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे
जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560






