आंबळे येथे गुटखा विक्रीविरोधात शिरूर पोलिसांची कारवाई; ९ हजार ७६ रुपयांचा गुटखा व पानमसाला जप्त

आंबळे येथे गुटखा विक्रीविरोधात शिरूर पोलिसांची कारवाई; ९ हजार ७६ रुपयांचा गुटखा व पानमसाला जप्त

सह्याद्रीचा आवाज  – बालाजी कांबळे 

शिरूर : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा व पानमसाल्याची बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांविरोधात शिरूर पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू ठेवला आहे. आंबळे (ता. शिरूर) येथे केलेल्या कारवाईत पोलिसांनी गुटखा व पानमसाला सदृश तंबाखूजन्य पदार्थ असा एकूण ९ हजार ७६ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजे आंबळे येथील श्रीदत्त अमृततुल्य हॉटेल परिसरात दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे सुमारे एक वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. यावेळी संदीप सोमनाथ फुलपगर (वय २४, रा. आंबळे, ता. शिरूर, जि. पुणे) याच्याकडे प्रतिबंधित गुटखा व पानमसाला विक्रीच्या उद्देशाने ताब्यात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

पोलिसांनी संबंधित माल ताब्यात घेत त्याची जप्ती केली. या कारवाईत एकूण ₹९,०७६ किमतीचा तंबाखू व पानमसाला सदृश माल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलीस अंमलदार अशोक भगवान चितारे (वय ३६ वर्षे, ब.नं. २४६१), नेमणूक शिरूर पोलीस स्टेशन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक ९७२/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर शेळके करीत आहेत.

दरम्यान, परिसरात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व इतर तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर विक्री होत असल्यास त्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून तपासणी व कारवाई सुरू ठेवण्यात येत आहे. आंबळे येथील या कारवाईमुळे प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांमध्ये पोलिसांच्या कारवाईची धास्ती निर्माण झाली आहे.

संपादक - रमेश मनोहर बनसोडे
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे

जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *