शिरूरमध्ये तीन पानी पत्त्यांचा जुगार उधळला; चौघांवर गुन्हा, १२ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त
Rjnews 27 मराठी – रमेश बनसोडे
शिरूर : शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत जुगारविरोधी कारवाई करत पोलिसांनी तीन पानी पत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या चार जणांवर महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये कारवाई केली. ही कारवाई ७ ऑक्टोबर २०२६ रोजी मौजे शिरूर, ता. शिरूर, जि. पुणे येथे करण्यात आली. जगदंब चायनिजच्या शेजारी असलेल्या पांढऱ्या रंगाच्या पत्र्याच्या शेडच्या आडोशाला काही इसम तीन पानी पत्त्यांचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला असता राहुल भाउसाहेब सोनवणे (वय २४, रा. पाबळफाटा, शिरूर), रोहन राजु पवार (वय १९, रा. पाबळफाटा, शिरूर), रविराज गोरख गव्हाणे (वय २८, रा. आण्णापूर, ता. शिरूर) आणि महादेव मच्छिंद्र मोरे (वय ३२, रा. पाबळफाटा, शिरूर) हे तीन पानी पत्त्यांचा जुगार खेळताना आढळून आले.
या कारवाईत पोलिसांनी १२ हजार ५५० रुपये रोख रक्कम, दोन पत्त्यांचे कॅट आणि एक बॉलपेन, असा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ८८६/२०२६, महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल गणेश संभाजी गोसावी (बक्कल क्र. २६८६), शिरूर पोलीस स्टेशन यांनी दिली असून गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक मुळीक करीत आहेत. गुन्हा दाखल करण्याचे काम पोलीस हवालदार शिंदे (बक्कल क्र. २४६३) यांनी पाहिले.
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे
जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560







