घरकुलाच्या स्वप्नाला उद्योगाची जोड; आळंदीच्या हभप ज्ञानेश्वर वहिलेंचा राज्यस्तरीय सन्मान

 घरकुलाच्या स्वप्नाला उद्योगाची जोड; आळंदीच्या हभप ज्ञानेश्वर वहिलेंचा राज्यस्तरीय सन्मान

अल्लाउद्दीन अलवी | पुणे जिल्हा प्रतिनिधी

 

आळंदी : सर्वसामान्य नागरिकाच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकारण्यासाठी बांधकाम क्षेत्रातून सातत्याने प्रयत्न करणारे आळंदीचे सुपुत्र हभप ज्ञानेश्वर महाराज वहिले यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत राज्यस्तरीय युवा उद्योजक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. द युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने आळंदी येथील डांगे पंच हॉल मंगल कार्यालयात आयोजित गुणगौरव पुरस्कार सोहळा २०२६ मध्ये हा सन्मान प्रदान करण्यात आला.

 

गरजू नागरिकांना परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध व्हावीत, या उद्देशाने हभप ज्ञानेश्वर महाराज वहिले यांनी गृहनिर्माण सोसायटीच्या माध्यमातून कमी खर्चातील फ्लॅट उपलब्ध करून देण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. उद्योगासोबत सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या या कार्याची दखल घेत द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष अन्सार शेख यांनी त्यांना पुरस्कार देऊन गौरविले.

 

शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचे चौदावे वंशज हभप श्रीनाथ महाराज गोसावी, श्री संत सावता महाराजांचे अठरावे वंशज हभप रमेश महाराज वसेकर आणि जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थान, देहूचे अध्यक्ष हभप पुरुषोत्तम महाराज मोरे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

 

यावेळी समाज कल्याण अधिकारी मनोज जाधव, अनंत कराड, राष्ट्रीय अध्यक्ष अन्सार शेख, राज्याध्यक्ष शकील मनियार, महिला राज्याध्यक्ष मंगलताई सासवडे, राष्ट्रीय कीर्तनकार हभप दादा महाराज सोनवणे, जिल्हाध्यक्ष काशिनाथ आल्हाट, उपाध्यक्ष अल्लाउद्दीन अलवी, वैशाली ज्ञानेश्वर वहिले, मेजर दादासाहेब सोपानराव मचाले, हभप अशोक मचाले, हभप संपत नागवडे, हभप प्रशांत मचाले, हभप जनार्दन जगताप, राजकुमार जाधव सर, रयत क्रांतीचे प्रवक्ते हरिभाऊ नागवडे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

यावेळी बोलताना हभप पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी ज्ञानेश्वर वहिले यांच्या उद्योग क्षेत्रातील कार्याचे कौतुक केले. सर्वसामान्यांसाठी परवडणाऱ्या घरांच्या संकल्पनेतून त्यांनी उद्योगासोबत सामाजिक बांधिलकी जपली असून, त्यांच्या कार्याची दखल घेऊन दिलेला हा पुरस्कार त्यांच्या योगदानाचा सन्मान असल्याचे त्यांनी सांगितले.स्तरीय सन्मान

संपादक - रमेश मनोहर बनसोडे
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे

जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *