बाबुरावनगरमध्ये दुखापतीच्या कारणावरून वाद; महिलेसह पतीलाही मारहाण, पाच जणांविरुद्ध गुन्हा

बाबुरावनगरमध्ये दुखापतीच्या कारणावरून वाद; महिलेसह पतीलाही मारहाण, पाच जणांविरुद्ध गुन्हा.

Rjnews27 मराठी 
शिरूर : शिरूर पोलीस स्टेशन हद्दीतील बाबुरावनगर येथे दुखापतीच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याची घटना ३० सप्टेंबर २०२६ रोजी रात्री घडली. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून लकी तात्यासाहेब दिवटे, प्रतिक्षा लकी दिवटे आणि त्यांच्यासोबत असलेल्या तीन अज्ञात व्यक्तींविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबुरावनगर येथे रात्री सुमारे १२.५७ वाजण्याच्या सुमारास दुखापतीच्या कारणावरून वाद झाला. तक्रारीनुसार, लकी तात्यासाहेब दिवटे, प्रतिक्षा लकी दिवटे तसेच त्यांच्यासोबत असलेल्या तीन अज्ञात इसमांनी एकत्र येऊन फिर्यादी महिलेला शिवीगाळ व दमदाटी केल्याचे नमूद करण्यात आले आहे.
यावेळी झालेल्या वादादरम्यान प्रतिक्षा लकी दिवटे हिने हातातील कटरने फिर्यादी महिलेच्या उजव्या हाताच्या मनगटावर मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे महिलेला दुखापत झाल्याचे पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत सांगण्यात आले आहे.
दरम्यान, पत्नीला सोडविण्यासाठी तिचे पती मध्ये आले असता त्यांनाही लकी तात्यासाहेब दिवटे आणि त्याच्यासोबत असलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी हाताने मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या घटनेनंतर संबंधित महिलेने शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ८६५/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार खेडकर, ब.नं. ३३२८ करीत आहेत.

संपादक - रमेश मनोहर बनसोडे
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे

जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *