आलेगाव पाग्यात २.६० लाखांचा मुरूम अवैध उत्खनन करून चोरी; अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल.
Rjnews27 मराठी – शिरूर
शिरूर : आलेगाव पागा येथील गट क्रमांक ५७५ मधील अकारी पड जमिनीतून महसूल विभागाची कोणतीही परवानगी न घेता मातीमिश्रित मुरूमाचे अवैध उत्खनन करून चोरी केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० सप्टेंबर २०२६ पासून २५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजेपर्यंतच्या कालावधीत मौजे आलेगाव पागा, ता. शिरूर येथील गट क्रमांक ५७५ मधून मातीमिश्रित मुरूमाचे अवैधरीत्या उत्खनन करण्यात आले. संबंधित इसमाने महसूल विभागाची परवानगी न घेता उत्खनन केलेला मुरूम चोरी केल्याचे निदर्शनास आले.
या घटनेत अंदाजे २४६ ब्रास मातीमिश्रित मुरूम अवैधरीत्या उत्खनन करण्यात आल्याचे नमूद असून, त्याची किंमत प्रति ब्रास १,०६० रुपये प्रमाणे सुमारे २ लाख ६० हजार ७६० रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी ग्राममहसूल अधिकारी आदित्य रंगनाथ गायकवाड (वय २९) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास सफौ भोते करीत असून, अवैध उत्खनन करणाऱ्या अज्ञात आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. गुन्हा २९ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६.२२ वाजता दाखल करण्यात आला आहे.
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे
जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560







