दौंडमध्ये देशी-विदेशी दारूची विक्री करताना एकास ताब्यात; १,७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त

दौंडमध्ये देशी-विदेशी दारूची विक्री करताना एकास ताब्यात; १,७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त

Rjnews 27 मराठी – विकास साळुंके 

मसनेरवाडी येडे वस्तीतील घटना; किराणा दुकानाच्या आडोशाला दारू विक्री सुरू असल्याची पोलिसांची कारवाई

 

दौंड : मसनेरवाडी येडे वस्ती, लिंगाळी (ता. दौंड) परिसरात देशी-विदेशी दारूची विक्री करताना एका व्यक्तीला दौंड पोलिसांनी ताब्यात घेतले. भगवान महादेव येडे (वय ५०, रा. मसनेरवाडी येडे वस्ती, लिंगाळी, ता. दौंड) असे कारवाई करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी सुमारे ३.४० वाजण्याच्या सुमारास मसनेरवाडी येडे वस्ती, लिंगाळी गावच्या हद्दीत दौंड शुगरकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या किराणा दुकानाच्या आडोशाला दारू विक्री सुरू असल्याचे आढळून आले.

 

या कारवाईत पोलिसांनी एकूण १ हजार ७४० रुपये किमतीचा देशी व विदेशी दारूचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये १ हजार ३२० रुपये किमतीच्या टँगो पंच कंपनीच्या ९० मिलीच्या ३३ बाटल्या तसेच ४२० रुपये किमतीच्या मॅकडॉल कंपनीच्या १८० मिलीच्या दोन बाटल्यांचा समावेश आहे.

 

या प्रकरणी पोलीस शिपाई गोरख बाबासाहेब हजारे यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, गुन्हा रजिस्टर क्रमांक ७२४/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार वैभव माने करीत आहेत.

संपादक - रमेश मनोहर बनसोडे
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे

जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *