पिंपळगावात विवाहित महिलेचा विहिरीत बुडून मृत्यू; पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा

पिंपळगावात विवाहित महिलेचा विहिरीत बुडून मृत्यू; पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा.

Rjnews 27 मराठी – विकास साळुंके 

दौंड : पिंपळगाव येथे २४ वर्षीय विवाहित महिलेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी महिलेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पतीसह तिघांविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पायल विशाल जाधव (वय २४, रा. पिंपळगाव, ता. दौंड, जि. पुणे) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिची आई पूजा हनुमंत माने (वय ५०, रा. जामखेड, जि. अहिल्यानगर) यांनी यवत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०२३ पासून २९ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या कालावधीत पायल हिला तिचा पती विशाल बबन जाधव, मावस सासू बानुबाई मनोहर जाधव आणि मावस सासरे मनोहर जाधव यांनी वेळोवेळी मानसिक व शारीरिक त्रास दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या त्रासाला कंटाळून पायल हिने पिंपळगाव येथील विहिरीत उडी मारल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पाण्यात बुडाल्याने तिचा मृत्यू झाला.

या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९९९/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भोसले करीत आहेत. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलीस हवालदार २०५४ जगताप यांनी केली.

संपादक - रमेश मनोहर बनसोडे
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे

जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *