नागरगाव येथील संघर्ष युवा मंचचा आदर्श – DJ ऐवजी मर्दानी खेळ आणि हलगीच्या तालात विसर्जन मिरवणूक

नागरगाव येथील संघर्ष युवा मंचचा आदर्श – DJ ऐवजी मर्दानी खेळ आणि हलगीच्या तालात विसर्जन मिरवणूक

Rjnews 27 मराठी – विजय कांबळे 

 

पारंपरिक कला-संस्कृतीचे दर्शन; संघर्ष युवा मंचची DJ मुक्त गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहात

नागरगाव – DJ ला फाटा देत संघर्ष युवा मंचची पारंपरिक गणपती विसर्जन मिरवणूक उत्साहात; मर्दानी आखाडा आणि हलगी ग्रुप ठरले आकर्षण

 

 

: यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये आधुनिकतेच्या नावाखाली सुरु असलेल्या कर्णकर्कश DJ संस्कृतीला फाटा देत संघर्ष युवा मंचने पारंपरिक कला आणि संस्कृतीचे दर्शन घडविणारी विसर्जन मिरवणूक उत्साहात पार पाडली.

 

मिरवणुकीत मोठ्या आवाजाच्या DJ ऐवजी पारंपरिक कार्यक्रमांवर भर देण्यात आला होता. यामध्ये विशेष आकर्षण ठरले ते राजमाता जिजाऊ मर्दानी आखाड्याचे थरारक शौर्यप्रदर्शन. आखाड्यातील मावळ्यांनी लाठी-काठी, तलवारबाजी, दांडपट्टा आदी मर्दानी खेळांची विविध प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली. छत्रपती शिवरायांच्या शौर्यपरंपरेची आठवण या वेळी करून देण्यात आली.

 

त्याचबरोबर पारंपरिक हलरी ग्रुपच्या सादरीकरणाने मिरवणुकीत वेगळाच रंग भरला. हलगीच्या पारंपरिक तालावर, ढोल-ताशाच्या निनादात आणि ‘गणपती बाप्पा मोरया’ च्या जयघोषात संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि उत्साहपूर्ण झाले होते.

 

DJ संस्कृतीला पर्याय म्हणून पारंपरिक कला जपण्याचा आणि तरुण पिढीला आपल्या संस्कृतीची ओळख करून देण्याचा संघर्ष युवा मंचचा हा उपक्रम सर्वत्र कौतुकास्पद ठरत आहे. आधुनिकतेच्या युगातही तरुणाईने आपली संस्कृती, परंपरा आणि शौर्याचा इतिहास विसरू नये, असा संदेश या मिरवणुकीतून देण्यात आला.

 

भक्तिमय वातावरणात आणि गणरायाच्या जयघोषात संघर्ष युवा मंचची ही DJ मुक्त विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली.

संपादक - रमेश मनोहर बनसोडे
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे

जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *