डीजे आणि गुलालाला फाटा; फेटे बांधून फुगड्यांचा फेर धरत नागरगावात गणपती विसर्जन मिरवणूक
रामराज्य प्रतिष्ठानचा पारंपारिक संस्कृतीचे जतन करत गणपती बाप्पांना निरोप
: प्रतिनिधी विजय कांबळे
नागरगाव – नागरगाव येथील निंभोळवस्तीमध्ये रामराज्य प्रतिष्ठानच्या गणपती विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक संस्कृतीचे जतन करत उत्साहपूर्ण आणि आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. डीजेचा दणदणाट आणि गुलालाला फाटा देत महिला, मुले तसेच ग्रामस्थांना फेटे बांधून पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. यावेळी फुगड्यांसह विविध पारंपरिक खेळ आणि सांस्कृतिक उपक्रमांनी मिरवणुकीची शोभा वाढवली.

रामराज्य प्रतिष्ठानच्या गणपतीची मिरवणूक यंदा विशेष आकर्षण ठरली. प्रभू श्रीराम यांच्या वेशभूषेत रामची भूमिका करणारे करण चौगुले, लक्ष्मणाच्या भूमिकेत रुद्र शेलार आणि सीतेच्या भूमिकेत तन्वी साठे सहभागी झाले होते. त्यांच्या पारंपरिक वेशभूषेने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
गणेशोत्सवाच्या बारा दिवसांत रामराज्य प्रतिष्ठानच्या वतीने गणपतीसमोर विविध देखावे व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. या कार्यक्रमांच्या माध्यमातून भारतीय संस्कृती, परंपरा आणि प्रभू श्रीराम यांच्या आदर्शांचा सुंदर संगम घडविण्याचा प्रयत्न करण्यातडीजे आणि गुलालाला फाटा; फेटे बांधून फुगड्यांचा फेर धरत नागरगावात गणपती विसर्जन मिरवणूक आला.
विसर्जन मिरवणुकीत महिला, मुले आणि ग्रामस्थांनी पारंपरिक पद्धतीने सहभाग घेतला. सर्वांना फेटे बांधून फुगड्या खेळण्यात आल्या. डीजे व गुलालापेक्षा पारंपरिक कला, संस्कृती आणि सामूहिक सहभागाला प्राधान्य देत काढण्यात आलेली ही मिरवणूक ग्रामस्थांसाठी अविस्मरणीय ठरली.
या उपक्रमासाठी रामराज्य प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सदस्य यांनी परिश्रम घेतले. पारंपरिक संस्कृतीचे जतन करत गणेशोत्सव साजरा करण्याच्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले.
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे
जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560







