तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत श्री वाघेश्वर विद्यालयाची घवघवीत कामगिरी; १४ सुवर्ण, ५ रौप्य व २ कांस्यपदकांसह २१ मल्लांची उल्लेखनीय कामगिरी.
Rjnews27 मराठी – बालाजी कांबळे
मांडवगण फराटा : शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री वाघेश्वर विद्यालय प्रशाला, मांडवगण फराटा येथील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. स्वातंत्र्य सेनानी वसंतराव डाबरे माध्यमिक विद्यालय, पिंपळे खिरे येथे आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत श्री वाघेश्वर विद्यालयाच्या मल्लांनी दमदार कामगिरी करत तब्बल १४ सुवर्णपदकांसह ५ रौप्य व २ कांस्यपदकांची कमाई केली. या स्पर्धेत विद्यालयाच्या एकूण २१ मल्लांनी उल्लेखनीय कामगिरी केली.

सुवर्णपदक विजेते
सुवर्णपदक पटकावत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या मल्लांमध्ये कु. वैष्णवी राजू पवार (३९ किलो), कु. शैनी रामप्रमोद कुमार (६९ किलो), चि. सार्थक शेखर कोकणे (४८ किलो), चि. अथर्व दादा कोकणे (३८ किलो), चि. यशराज धुळू भडंगे (३५ किलो), चि. अभिराज राम भोर (६२ किलो), चि. उदय अशोक जगताप (५२ किलो), चि. अधिकार प्रकाश फराटे (५५ किलो), चि. प्रणव जालिंदर गवळी (७७ किलो), चि. शुभम अण्णासाहेब जगताप (४४ किलो), चि. चांद कय्युम सुजानी (५५ किलो), चि. तनय सुभाष काळपे (६५ किलो), चि. यशराज रविंद्र जाधव (५७ किलो) आणि चि. सुजल अमोल फराटे (१३० किलो) यांचा समावेश आहे.
या सर्व सुवर्णपदक विजेत्या मल्लांनी आपल्या-आपल्या वजनगटात दमदार कामगिरी करत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.
रौप्यपदक विजेत्यांचीही उल्लेखनीय कामगिरी
द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या मल्लांमध्ये कु. पूजा दीपक काळे (४२ किलो), कु. स्वातिका श्रावण बनसोडे (३० किलो), चि. साहिल उल्हास शितोळे (६० किलो), चि. श्रेयस नितीन फराटे (७७ किलो) आणि चि. शुभम खंडेराव थोरात (४५ किलो) यांनी रौप्यपदक पटकावले.
कांस्यपदकांवरही विद्यालयाची मोहोर
तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या मल्लांमध्ये कु. भूमिका भीमराव थोरात आणि कु. मुलाणी मेहराज अशफाक यांनी कांस्यपदक मिळवत विद्यालयाच्या यशात भर घातली.
या संपूर्ण कामगिरीमुळे श्री वाघेश्वर विद्यालयाच्या कुस्तीपटूंनी तालुकास्तरावर आपली वेगळी छाप उमटवली असून, त्यांच्या या यशाबद्दल विद्यालय परिसरातून कौतुक व्यक्त होत आहे.
या मल्लांना क्रीडाशिक्षक श्री. येवले सर, श्री. वाळुंज सर, श्री. विजय कराळे सर, श्री. गवळी सर आणि सौ. घोडके मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच कुस्ती कोच श्री. स्वप्निल शितोळे सर आणि सौ. धनश्री शितोळे मॅडम यांचे प्रशिक्षण मिळाले. कुस्ती मार्गदर्शक श्री. राजेंद्र कांबळे सर यांचेही मल्लांना मार्गदर्शन लाभले.
विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल प्राचार्य, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षिका, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून सर्व यशस्वी मल्लांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले असून, आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे
जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560







