भीमा नदीला आलेल्या पुरामुळे नागरगावातील  कोल्हापुरी बंधारा वाहून गेला! शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप

भीमा नदीला आलेल्या पुरामुळे नागरगावातील  कोल्हापुरी बंधारा वाहून गेला! शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप

शिरूर (प्रतिनिधी) – सातारा रोडवरील पारगाव व नागरगाव परिसरात भीमा नदीला आलेल्या जोरदार पुरामुळे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पाण्याच्या जोरदार प्रवाहात पूर्णतः वाहून गेला आहे. या दुर्घटनेत परिसरातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, त्यांची पाण्याच्या मोटारी, मोटारीचे पाईप, तसेच लाईनचे विजेचे खांब पुराच्या प्रवाहात वाहून गेले आहेत.

स्थानिक शेतकरी या बंधाऱ्यावर अवलंबून होते. पाणी साठवून ते आपल्या शेतीसाठी सिंचनासाठी वापरत होते. परंतु अचानक आलेल्या पाण्याच्या लाटेमुळे संपूर्ण यंत्रणा कोलमडली असून शेतकऱ्यांना आर्थिक व उत्पादनाच्या मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे.

पारगावातील व नागरगाव. आंधळगाव. शेतकरी मोठ्या संख्येने आज ग्रामपंचायत आणि महसूल विभागाकडे धाव घेत आहेत. “आमचे नुकसान खूप मोठं आहे. शासनाने त्वरित पंचनामे करून आम्हाला मदत द्यावी,” अशी मागणी संतप्त शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

प्रशासनाकडून दुर्लक्ष?

शेतकरी असा आरोप करत आहेत की, नदीला पाणी वाढणार हे हवामान खात्याच्या इशाऱ्यांवरून आधीच स्पष्ट होते. तरीही कोणताही खबरदारीचा उपाय न घेतल्यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे. “शासनाने वेळेवर योग्य उपाययोजना केल्या असत्या, तर आज आमच्या हातून हजारो रुपयांचे साहित्य वाहून गेले नसते,” असे व्यथित मनाने शेतकरी सांगत आहेत.

आता पुढे काय?

शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय, कृषी विभाग आणि महावितरणकडे नुकसानभरपाईसाठी अर्ज करण्याची तयारी सुरू केली आहे. काही ठिकाणी आंदोलक शेतकऱ्यांनी “प्रशासन जागे होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील,” असा इशाराही दिला आहे.

विशेष मागणी:
सरकार व स्थानिक प्रशासनाने शेतकऱ्यांच्या नुकसानीची त्वरित दखल घेऊन पंचनामे करावेत आणि भरपाई जाहीर करावी, अशी आग्रही मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.
(आपल्या प्रतिक्रिया, फोटो आणि व्हिडिओ आमच्यापर्यंत पोहोचवा – RJNEWS27MARATHI.COM वर!)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *