वाणिज्यच्या विद्यार्थ्यांना SAP FICO चे धडे; रोजगाराभिमुख कौशल्यांवर भर

वाणिज्यच्या विद्यार्थ्यांना SAP FICO चे धडे; रोजगाराभिमुख कौशल्यांवर भर

एकनाथ सिताराम दिवेकर महाविद्यालयात मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन

Rjnews27 मराठी -योगेश राऊत

पाटस : वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना आधुनिक अकाउंटिंग तंत्रज्ञानाची ओळख व्हावी आणि रोजगाराच्या संधी वाढाव्यात, या उद्देशाने एकनाथ सिताराम दिवेकर महाविद्यालयात ‘SAP FICO Accounting’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले.

पुणे येथील Nice Computer चे संचालक प्रशांत बाळू टेंबरे यांनी विद्यार्थ्यांना SAP FICO प्रणालीचे कार्य, आर्थिक व्यवहारांचे व्यवस्थापन, फायनान्शियल रिपोर्टिंग आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील उपयोग याबाबत मार्गदर्शन केले. तसेच Tally Prime, GST, Advanced Excel आणि SAP FICO यांसारखी कौशल्ये आत्मसात केल्यास करिअरच्या अधिक संधी उपलब्ध होऊ शकतात, असे त्यांनी सांगितले. क्रिएटिव्ह कॉम्प्युटर, पाटसचे संचालक सचिन निंबाळकर यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल शितोळे यांच्या हस्ते प्रमुख वक्ते प्रशांत टेंबरे यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला प्रा. संगीता साळवे, प्रा. स्वप्नाली दिवेकर, प्रा. नवनाथ दिवेकर यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. संगीता साळवे यांनी केले, तर आभार प्रा. नवनाथ दिवेकर यांनी मानले.

या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना आधुनिक अकाउंटिंग तंत्रज्ञान, व्यावहारिक कौशल्ये आणि रोजगाराभिमुख शिक्षणाचे महत्त्व समजण्यास मदत झाली.

संपादक - रमेश मनोहर बनसोडे
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे

जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *