सिद्धिविनायक मंदिरात बाळासाहेब नागवडे यांच्यासह नागवडे कुटुंबीयांना आरतीचा मान

सिद्धिविनायक मंदिरात बाळासाहेब नागवडे यांच्यासह नागवडे कुटुंबीयांना आरतीचा मान

Rjnews27 मराठी – अल्लाउद्दीन अलवी 

बाभुळसर बुद्रुक : येथील मानाचा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री सिद्धिविनायक मंदिरात धार्मिक वातावरणात आरतीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी शिरूर तालुका खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष बाळासाहेब (नाना) अर्जुनराव नागवडे व त्यांच्या सुविद्य पत्नी, शिरूर तालुका खरेदी-विक्री संघाच्या संचालिका प्रतिभा (वहिनी) बाळासाहेब नागवडे यांना आरतीचा मान देण्यात आला.

तसेच दूध उत्पादक शेतकरी ज्ञानदेव बबनराव नागवडे व त्यांच्या सुविद्य पत्नी मीनाताई ज्ञानदेव नागवडे, तसेच प्रगतशील शेतकरी सतीश दगडू नागवडे पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी वर्षा (वहिनी) सतीश नागवडे पाटील या तिन्ही कुटुंबांतील दाम्पत्यांच्या हस्ते श्री सिद्धिविनायकाची विधिवत आरती करण्यात आली.

आरतीनंतर उपस्थित भाविकांसाठी या तीनही कुटुंबांच्या वतीने प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने सहभागी होत “गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया” असा जयघोष केला. त्यामुळे मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला.

दरम्यान, सायंकाळच्या सत्रात बाभुळसर बुद्रुक भजनी मंडळाच्या वतीने भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भजनाच्या माध्यमातून भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, भाविकांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

आरती, प्रसाद व भजन कार्यक्रमामुळे सिद्धिविनायक मंदिर परिसरात दिवसभर भक्तीमय वातावरण पाहायला मिळाले. भाविकांनी श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेत धार्मिक कार्यक्रमात सहभागी होत आनंद व्यक्त केला.

संपादक - रमेश मनोहर बनसोडे
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे

जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *