सराईत आरोपी दत्ता अशोक शिंदे याच्यावर दोन वर्षांसाठी तडीपारीची कारवाई; यवत पोलिसांची धडक कारवाई
Rjnews27 मराठी – विकास साळुंके
राहू, ता. दौंड : राहू येथील रेकॉर्डवरील सराईत आरोपी दत्ता अशोक शिंदे (वय २९ वर्षे) याच्यावर यवत पोलिसांनी दोन वर्षांसाठी तडीपारीची कारवाई केली आहे. आरोपीविरुद्ध यवत पोलीस ठाण्याच्या अभिलेखावर एकूण १९ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने त्याच्यामुळे परिसरातील सामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते.
कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी यवत पोलिसांनी दत्ता अशोक शिंदे याच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाईचा प्रस्ताव तयार करून दौंड उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे सादर केला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर शिंदे यास पुणे जिल्हा, पुणे शहर व पिंपरी-चिंचवड परिसर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत व श्रीगोंदा तालुक्यांच्या हद्दीतून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.
या कारवाईमुळे रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक निर्माण करण्यासोबतच परिसरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होणार आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची भूमिका पोलिसांनी घेतली आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर, तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मारोती मेतलवाड, सहायक फौजदार महेश बनकर, तसेच स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण व यवत पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदारांनी या कारवाईत सहभाग घेतला.
कारवाईमध्ये पोहेवा संदीप देवकर, पोहेवा रॉकी देवकाते, पोहेवा महेंद्र चांदणे, पोका धिरज जाधव, पोका प्रतीक जगताप, पोका अमोल भुजबळ, पोका मारुती बाराते, पोका सचिन गुंड, पोका दिनेश लोणकर आणि पोका विनीत कुऱ्हाडे यांनी सहभाग घेतला.
रेकॉर्डवरील सराईत आरोपीवर करण्यात आलेल्या या कारवाईमुळे राहू परिसरासह संबंधित हद्दीत गुन्हेगारी कारवायांना आळा बसण्यास मदत होईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.



