जुन्या भांडणाच्या कारणावरुन गंभीर दुखापत करणाऱ्या आरोपींना भारती विद्यापीठ पोलीसांकडुन शिताफीने अटक  

जुन्या भांडणाच्या कारणावरुन गंभीर दुखापत करणाऱ्या आरोपींना भारती विद्यापीठ पोलीसांकडुन शिताफीने अटक

 

प्रतिनिधी शाम जगताप

 

दिनांक ०४/०७/२०२६ रोजी रोजी रात्री ०२/३० वा. चे सुमारास फिर्यादी ओंकार सुनिल लोखंडे वय-३१ वर्षे धंदा-भंगार व्यवसास रा.अं. बिल्डीग-७१९, एस. आर. से वसाहत लेक टाऊन जवळ, कात्रज, पुणे हे त्यांचा मित्र सागर बिरमाने याचे सोबत एस. आर. अ वसाहत, लेक टाऊनजवळ, कात्रज पुणे येथे असतांना आरोपो नामे सरफराज उर्फ डर शेख, गणेश थोरात, दिनेश नेटके दुर्गेश पवार असे मिळुन जुन्या भांडणाच्या कारणांवरुन सरफराज शेख यांने त्याचेकडील लोखंडी कु-हाडीने फिर्यादीचे डोक्यास कानास, पाठीवर वार करुन गंभीर जखमी केले तसेच गणेश थोरात यांनेही तिच कु-हाड हातात घेउन फिर्यादीचे पाठीवर मारुन जखमी केले असुन दिनेश नेटके, दुर्गेश पवार यांने फिर्यादी व त्याचा मित्र सागर विरमाने यांस वाईट वाइंट शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली आहे म्हणून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ३६३/२०२६, भारतीय न्याय संहोता २०२३ चेकलम ११८ (२), ३५२,३ (५) सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चेकलम ३७(१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल आहे.

 

दाखल गुन्ह्यातील आरोपींचा वरीष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस अमलदार शोध घेत असताना पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे, अभिनय चौधरी, सोहम शेंडकर यांना आरोपी हे साळवे गार्डन येथे लपुन बसले असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. त्याप्रमाणे नमुद आरोपीचा शोध घेतला असता आरोपी नामे १. सरफराज उर्फ डर समीर शेख, वय-२८ वर्षे, बंदा केअर टेकर, रा. बी/१२७, एस. आर.ए वसाहत, लेकटाऊन जवळ, कात्रज पुणे. २. गणेश अशोकधोरात, वय २२ वर्षे, बंदा नोकरी, रा. फ्लॅट नंबर ४०१, गजराज सोसायटी, अभिनवकॉलेज जवळ, नन्हे, पुणे. ३. दुर्गेश पंडीत पवार, वय-२२ वर्षे, धंदा व्यवसाय, रा.ए विंग/८१९, एस. आर.ए वसाहत, लेकटाऊन जवळ, कात्रज पुणे ४. दिनेशविकासनेटके, वय ३३ वर्षे, धंदा नोकरी, रा. बी, विंग/८१९, एस.आर.ए वसाहत, लेकटाऊन जवळ, कात्रज पुणे हे मिळून आल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे.

 

सदरची कामगिरी मिलींद मोहीते, पोलीस उप आयुक्त परिमंडळ, पुणे शहर, राहुल आवारे, सहाय्यक पोलीस आयुक्त भारती विद्यापीठ विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीत पोलीस स्टेशनकडील रिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) कैलास कोडग, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, अण्णा दराडे, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, सोहम शेंडकर, अमिर मुलाणी, महेश बारवकर, मंगेश पवार, सचिन सरपाले, तुकाराम सुतार, संदीप आगळे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, प्रदीप चव्हाण, निलेश खैरमोडे, यांच्या पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *