प्रतिनिधी : श्याम जगताप | जेजुरी
जेजुरी नगरपालिकेचे माजी कार्यक्षम नगरसेवक तथा समाजसेवक मा. गणेश उर्फ (शेठ) अशोकराव शिंदे यांची अठरा पगड बारा बलुतेदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट, महाराष्ट्र राज्यच्या राज्य उपाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत संस्थेने त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविल्याने जेजुरी शहरासह पुरंदर तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
निवडीचे अधिकृत पत्र संस्थापक अध्यक्ष मा. आप्पासाहेब भांडवलकर तसेच वरिष्ठ पश्चिम महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. नारायण उर्फ (मामा) वामन जाधव यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. फटाक्यांच्या आतषबाजीत आणि उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या सत्कार सोहळ्याने उपस्थितांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.
जेजुरी नगरपालिकेचे नगरसेवक म्हणून कार्यरत असताना गणेश (शेठ) शिंदे यांनी नागरिकांच्या विविध प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करत विकासकामांना गती देण्याचे कार्य केले. सामाजिक बांधिलकी जपत गरजू नागरिकांना मदत, युवकांना प्रोत्साहन, विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग आणि सर्व समाजघटकांना एकत्र घेऊन काम करण्याची त्यांची कार्यशैली यामुळे त्यांनी लोकांच्या मनात विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेत अठरा पगड बारा बलुतेदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्टने त्यांची राज्य उपाध्यक्षपदी निवड केली असल्याचे मानले जात आहे.
या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य सदस्य बाळासाहेब जरांडे, साहिल चौरे, पुणे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख शामराव जगताप, पुणे जिल्हा सदस्य आकाश पवार, पुरंदर तालुका उपाध्यक्ष राहुल पवार, जेजुरी शहर अध्यक्ष सचिन कुंभार, जेजुरी शहर उपाध्यक्ष अनिल भोंडे, जानू दोडके, गणेश चव्हाण, शांताराम खोमणे, सिताराम दोडके, दत्ता सकट, श्रीकांत दोडके, चेअरमन भिसे, भाऊ दोडके, अजय भिसे, पप्पू भिसे, कौशल खुडे, प्रथमेश दोडके, पुरंदर तालुका महिला अध्यक्षा मयूरी जरांडे, तालुका उपाध्यक्षा सोनाली दोडके, जेजुरी शहर महिला अध्यक्षा योगिता मोरे, उपाध्यक्षा दिपाली कुंभार, सचिव कविता भोंडे, खजिनदार सुषमा शिंदे, सदस्य शलाका मोरे, नानी कोळेकर, अनिता शिंदे तसेच ट्रस्टचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य आणि अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्य उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन शिक्षण, आरोग्य, सामाजिक एकोपा, युवकांचे सक्षमीकरण आणि गरजू नागरिकांच्या मदतीसाठी अधिक व्यापक स्वरूपात कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. गणेश (शेठ) अशोकराव शिंदे यांच्या नेतृत्वातून ट्रस्टच्या समाजहिताच्या उपक्रमांना नवी दिशा आणि अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. त्यांच्या माध्यमातून समाजसेवा आणि जनहिताची कार्ये अधिक व्यापक पातळीवर पोहोचावीत, हीच सर्व स्तरातून व्यक्त होत असलेली भावना आहे.




