“कॉलेज की प्रेमप्रकरणाचे अड्डे? प्राध्यापकाने वर्गातच विद्यार्थिनीला केले प्रपोज; विद्यार्थ्यांचा संताप, मारहाण करून धडा शिकवला!”
छेडछाड व गैरवर्तनाच्या तक्रारीनंतर कॉलेज प्रशासनाची कारवाई; प्राध्यापक निलंबित, चौकशी सुरू
(Rjnews27 मराठी
कर्नाटक राज्यातील नेलमंगळा येथील सिद्धार्था मेडिकल कॉलेजमध्ये घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. एका प्राध्यापकाने वर्गातच एका विद्यार्थिनीला प्रेमाची मागणी घातल्याचा आरोप समोर आला असून या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. “हे कॉलेज आहे की प्रेमप्रकरणांचे अड्डे?” असा सवाल विद्यार्थ्यांमध्ये उपस्थित केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित प्राध्यापकाने वर्गातच एका विद्यार्थिनीसमोर प्रेमाची कबुली देत तिला प्रपोज केले. मात्र विद्यार्थिनीने त्याचा प्रस्ताव ठामपणे नाकारला. त्यानंतर प्राध्यापकाने उलट दावा करत विद्यार्थिनीनेच आधी प्रपोज केल्याचे सांगितले. या दाव्याचे पुरावे मागितल्यावर वाद अधिकच चिघळला.
या घटनेनंतर संतप्त विद्यार्थ्यांनी संबंधित प्राध्यापकाला जाब विचारला आणि परिस्थिती इतकी बिघडली की विद्यार्थिनी व काही विद्यार्थ्यांनी मिळून प्राध्यापकाला चोप दिल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, या प्रकाराची गंभीर दखल घेत कॉलेजच्या प्राचार्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. एफआयआरमध्ये प्राध्यापकावर कॉलेज परिसरात गैरवर्तन करणे व महिला विद्यार्थिनींना लैंगिक छळ केल्याचे आरोप नमूद करण्यात आले आहेत. यापूर्वीही काही विद्यार्थिनींनी संरक्षणाची मागणी करत तक्रारी दिल्याचे उघड झाले आहे.
कॉलेज प्रशासनाने तत्काळ कारवाई करत संबंधित प्राध्यापकाला निलंबित केले असून चौकशी सुरू करण्यात आली आहे. चौकशीदरम्यान कॉलेज परिसरात येण्यास मनाई करण्यात आली होती. मात्र इशारा असूनही 23 मार्च रोजी प्राध्यापक पुन्हा कॉलेजमध्ये दाखल झाल्याचा आरोप आहे. यावेळी त्यांनी एका विद्यार्थिनीचा हात जबरदस्तीने पकडून तिच्याशी अयोग्य वर्तन केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेमुळे शैक्षणिक संस्थांमधील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत प्रशासनाने कडक पावले उचलण्याची मागणी होत आहे.
— Rjnews27 मराठी




