३६ वर्षांची भक्तीपरंपरा अखंड; त्रिपुरारी पौर्णिमेला काकड आरतीची सांगता

३६ वर्षांची भक्तीपरंपरा अखंड; त्रिपुरारी पौर्णिमेला काकड आरतीची सांगता

 

ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात गणेशवाडी दुमदुमली; महिला, तरुण आणि बालगोपाळांचा उत्स्फूर्त सहभाग

 

सह्याद्रीचा आवाज | योगेश राऊत

 

कानगाव : वारकरी संप्रदायाचा आध्यात्मिक वारसा आणि भक्तीपरंपरा जपत गणेशवाडी (ता. दौंड) येथील श्री नवनाथ तरुण मंडळ भजनी मंडळाच्या वतीने गेल्या ३६ वर्षांपासून सुरू असलेल्या काकड आरतीची त्रिपुरारी पौर्णिमेला भक्तिमय वातावरणात सांगता करण्यात आली. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महिनाभर पहाटे काकड आरती, भजन आणि हरिनामाच्या गजराने परिसर पवित्र झाला होता. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंदिर परिसरातून टाळ-मृदंगाच्या निनादात दिंडी प्रदक्षिणा काढण्यात आली. ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषाने संपूर्ण गणेशवाडी भक्तिरसात न्हाऊन निघाली. या सोहळ्यात महिला, तरुण, बालगोपाळ आणि ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. महिलांनी पारंपरिक फुगडी खेळत भक्ती आणि आनंदाचा संगम साधला. दिंडी प्रदक्षिणेनंतर विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. ३६ वर्षांपासून अखंड सुरू असलेली ही परंपरा नव्या पिढीत वारकरी संस्कार, श्रद्धा आणि अध्यात्माची प्रेरणा देत आहे. या धार्मिक उपक्रमातून ग्रामएकता आणि भक्तिभावाचा सुंदर संदेश देण्यात आला.

 

सह्याद्रीचा आवाज — ग्रामीण भागातील श्रद्धा, संस्कृती आणि जनभावनेचा विश्वासार्ह आवाज.

संपादक - रमेश मनोहर बनसोडे
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे

जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Verified by MonsterInsights