शेठ जोतीप्रसाद विद्यालयाचे गुणवंत शिक्षक पोपटराव गिरमे सर यांचा सन्मान

शेठ जोतीप्रसाद विद्यालयाचे गुणवंत शिक्षक पोपटराव गिरमे सर यांचा सन्मान

 

दौंड तालुका मुख्याध्यापक संघ व टीडीएफ संघटनेच्या वतीने गुणवंत शिक्षक पुरस्काराने गौरव

 

पारगाव (ता. दौंड) | प्रतिनिधी : संजय चव्हाण

 

शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत आदर्श शिक्षक म्हणून नावलौकिक मिळविणारे शेठ जोतीप्रसाद विद्यालयाचे शिक्षक श्री. पोपटराव गिरमे सर यांना दौंड तालुका मुख्याध्यापक संघ व टीडीएफ संघटनेच्या वतीने गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पारगाव येथे शनिवार, दि. २१ रोजी आयोजित तालुकास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा–२०२६ मध्ये त्यांचा गौरव करण्यात आला.

 

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय, समर्पित व आदर्शवत कार्याची दखल घेत मान्यवरांच्या हस्ते गिरमे सर यांना शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, पुष्पहार व सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. त्यांच्या या यशाबद्दल उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात अभिनंदन करीत पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

कुटुंबीयांसह शिक्षकवृंदाची उपस्थिती

 

गिरमे सर यांच्या सन्मानाच्या आनंदमयी क्षणी त्यांच्या पत्नी व मुलांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली. तसेच शेठ जोतीप्रसाद विद्यालयातील शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या सहकाऱ्याच्या यशात सहभागी झाला.

 

यावेळी विद्यालयाचे पर्यवेक्षक रामा होले, संस्थेचे अधीक्षक सुभाष पवार, शरद पवाळ सर, सोनवणे सर, डॉ. मोरे, शितोळे सर, विशाल ओव्हाळ सर, संजय चव्हाण सर व निकम सर यांच्यासह विद्यालयातील मान्यवर उपस्थित होते.

 

मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण

 

या पुरस्कार वितरण सोहळ्यास पुणे विभागाचे शिक्षक आमदार कौस्तुभ गावडे, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल बाबा जगदाळे, दौंडचे माजी आमदार रमेश आप्पा थोरात, दौंड पंचायत समितीचे सभापती सुखदेव चोरमले, जिल्हा परिषद सदस्य गायत्री खळदकर, पंचायत समिती सदस्य मनीषा ताकवणे, पारगावचे सरपंच सुभाष तात्या बोत्रे, दौंड तालुक्याचे माजी उपसभापती सयाजी आण्णा ताकवणे, पोपट भाई ताकवणे व सुभाष फासगे उपस्थित होते.

 

याशिवाय महाराष्ट्र राज्य टी.डी.एफ. संघटनेचे अध्यक्ष जी. के. थोरात सर, जिल्हा समन्वयक प्राचार्य तुकाराम बेनके, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रसाद गायकवाड, सचिव शिवाजी कामठे, रोहित साठे यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी, प्राचार्य आणि शिक्षक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

शैक्षणिक कार्याचा गौरव

 

पोपटराव गिरमे सर यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करताना उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या योगदानाचे कौतुक केले. गुणवंत शिक्षक पुरस्कारामुळे त्यांच्या कार्याला नवी प्रेरणा मिळणार असून, भविष्यातही त्यांनी शिक्षण क्षेत्रात असेच उल्लेखनीय योगदान द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

 

सह्याद्रीचा आवाज | शिक्षण क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान, समाजापर्यंत पोहोचविणारा विश्वासार्ह आवाज.

संपादक - रमेश मनोहर बनसोडे
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे

जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Verified by MonsterInsights