इनामगावात दोन इलेक्ट्रिक मोटारींची चोरी; २० हजारांचा मुद्देमाल लंपास

इनामगावात दोन इलेक्ट्रिक मोटारींची चोरी; २० हजारांचा मुद्देमाल लंपास

Rjnews 27 मराठी – बालाजी कांबळे 

इनामगाव (ता. शिरूर) : पुणे ग्रामीण जिल्ह्यातील शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या इनामगाव येथे शेतजमिनीतून दोन इलेक्ट्रिक मोटारी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्याने १० एचपी क्षमतेच्या तारो कंपनीच्या दोन मोटारी चोरून नेल्या असून, या चोरीत अंदाजे २० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, अज्ञात आरोपीचा शोध सुरू आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रविण रावसाहेब मचाले (वय ४७, रा. इनामगाव, ता. शिरूर, जि. पुणे) यांच्या शेतजमिनीतून दिनांक ७ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६ ते ८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान ही चोरी झाली. या कालावधीत अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांची एक आणि निलेश शंकर गाजरे यांची एक अशा दोन इलेक्ट्रिक मोटारी चोरून नेल्या.

 

या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक ८९२/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार शिंदे करीत आहेत. शिरूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अज्ञात चोरट्याचा शोध घेण्याची कार्यवाही सुरू आहे.

संपादक - रमेश मनोहर बनसोडे
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे

जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *