सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी नगराध्यक्षांचा थेट संवाद
Rjnews 27 मराठी – योगेश साळुंके
दौंड : शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी पार पाडणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी दौंड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा कु. दुर्गादेवी इंद्रजित जगदाळे (पाटील) यांनी कर्मचाऱ्यांसोबत थेट संवाद साधला. सकारात्मक वातावरणात झालेल्या या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
विमा पॉलिसी, कामाचे स्वरूप व विभागणी, कामाच्या वेळेचे नियोजन तसेच निवासस्थानाचा प्रश्न यांसह विविध अडचणी कर्मचाऱ्यांनी नगराध्यक्षांसमोर मांडल्या. या प्रश्नांवर योग्य तो मार्ग काढण्यासाठी आवश्यक कार्यवाही व पाठपुरावा करण्याची भूमिका नगराध्यक्षांनी व्यक्त केली.
कर्मचाऱ्यांसोबत प्रत्यक्ष बसून त्यांच्या समस्या जाणून घेतल्याबद्दल कर्मचाऱ्यांनी नगराध्यक्षांचे कौतुक केले. “सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष संवाद साधणाऱ्या दौंडमधील पहिल्या नगराध्यक्षा आपणच आहात,” असे म्हणत कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहत थेट संवाद साधण्याचा हा उपक्रम नगर परिषदेच्या कामकाजातील सकारात्मक पाऊल मानले जात आहे.
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे
जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560







