दौंडमध्ये मोकळ्या जागेत पैसे लावून रमीचा जुगार; सहा जणांवर कारवाई

दौंडमध्ये मोकळ्या जागेत पैसे लावून रमीचा जुगार; सहा जणांवर कारवाई

Rjnews27 मराठी – दौंड प्रतिनिधी – विकास साळुंके 

दौंड : दौंड शहरातील म्हसोबा चाळ, शालिमार चौक परिसरात बंद घराच्या पाठीमागील मोकळ्या जागेत पैसे लावून रमीचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत सहा जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई २९ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास दौंड शहरातील म्हसोबा चाळ, शालिमार चौक येथील एका बंद घराच्या पाठीमागील मोकळ्या जागेत करण्यात आली.

या कारवाईत सहदेव नागनाथ जाधव (वय ३८), थॉमस जेम्स उघडे (वय ५४), अजय रमण शिंदे (वय ३६), अंबादास रामचंद्र सलगर (वय ५४), किरण शांताराम शिंदे (वय ५७) आणि राजू राजाराम पलंगे (वय ४५) यांच्यावर कारवाई करण्यात आली.

 

पोलिसांच्या कारवाईत रोख ४ हजार ४७० रुपये तसेच ५२ पत्त्यांचे दोन कॅट असे जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. आरोपी हे पैसे लावून रमी नावाचा जुगार खेळत व खेळवीत असल्याचे पोलिसांच्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

 

या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ७२५/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार वैभव माने करीत आहेत. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलीस हवालदार निकम यांनी केली आहे.

संपादक - रमेश मनोहर बनसोडे
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे

जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *