चिंचणी विकास सोसायटीच्या चेअरमनपदी विकास चंद्रकांत जगताप यांची बिनविरोध निवड
Rjnews27 मराठी – रमेश बनसोडे
चिंचणी : चिंचणी विकास सोसायटीच्या चेअरमनपदासाठी विकास चंद्रकांत जगताप यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बुधवार, दि. १९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता सोसायटीच्या कार्यालयात निवडणूक प्रक्रिया पार पडली. चेअरमनपदासाठी विकास जगताप यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली.
मागील चेअरमन नवनाथ शंकर पवार यांनी दुसऱ्या व्यक्तीस संधी मिळावी या उद्देशाने आपल्या चेअरमनपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी विकास चंद्रकांत जगताप यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी श्री. पी. बी. पिसाळ यांनी त्यांच्या बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा केली.
निवडणूक प्रक्रियेचे कामकाज निवडणूक अधिकारी श्री. पी. बी. पिसाळ यांनी पाहिले, तर सोसायटीचे सचिव श्री. धनवटे यांनी त्यांना सहकार्य केले. निवडीनंतर उपस्थित मान्यवर, संचालक मंडळ, सभासद व ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचित चेअरमन विकास जगताप यांचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी गुरुवर्य संभाजी (तात्या) पवार यांनी विकास जगताप यांचा सन्मान करून त्यांना आशीर्वाद दिला. तसेच त्यांच्या आगामी कार्यासाठी आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
नवनिर्वाचित चेअरमन विकास जगताप यांच्या निवडीमुळे सोसायटीच्या कारभाराला नवी दिशा मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. यावेळी सोसायटीचे सर्व संचालक, सभासद तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी विकास जगताप यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.




