जेजुरी (प्रतिनिधी):शाम जगताप
अठरा पगड बारा बलुतेदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जेजुरी येथे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वितरण व सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विविध पदांवर नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करून त्यांच्या सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमात ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष मा. आप्पासाहेब भांडवलकर, प्रदेशाध्यक्ष राहुल काका भोंडे आणि पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नारायण मामा जाधव यांच्या शुभहस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यामध्ये पुरंदर तालुका सचिवपदी दत्तात्रय सकट, पुरंदर तालुका सल्लागारपदी सिताराम दोडके, जेजुरी शहर सचिवपदी गणेश चव्हाण, जेजुरी शहर टपरी धारक संघटना अध्यक्षपदी नानासाहेब खोमणे, जेजुरी शहर कार्याध्यक्षपदी सिराज पानसरे, जेजुरी शहर महिला कार्याध्यक्षा रोहिणी खुडे, जेजुरी शहर सरचिटणीस प्रज्ञा भोसले, जेजुरी शहर महिला पुरंदर तालुका कार्याध्यक्ष नीलम मोरे तसेच जेजुरी शहर महिला सहसचिवपदी वंदना मोरे यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करताना सामाजिक एकोपा, समाजहिताची भावना आणि संघटनात्मक बळकटीसाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचे आवाहन केले. समाजातील सर्व घटकांना एकत्रित घेऊन विविध सामाजिक, शैक्षणिक आणि जनकल्याणकारी उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य सदस्य बाळासाहेब जरांडे, पुणे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख शामराव जगताप, महिला प्रदेशाध्यक्षा सुजाताई गुरव, पुणे जिल्हा महिला अध्यक्षा राणी भंडलकर, पुरंदर तालुका महिला अध्यक्षा मयुरी जरांडे, पुरंदर तालुका उपाध्यक्ष सोनाली दोडके, जेजुरी शहर महिला अध्यक्षा योगिता मोरे, सचिव कविता भोंडे, खजिनदार वैशाली सोनवणे, शहराध्यक्ष सचिन कुंभार, जानू दोडके, सुखदेव मोरे, नवनाथ खोमणे, सचिन आढाळगे, जय साळुंखे, अजय भिसे, मच्छिंद्र बडे, धनाजी खुडे, संतोष साळुंखे, विजय जाधव, वैभव बारभाई, श्रीकांत दोडके, मच्छिंद्र दोडके, जालिंदर भंडलकर, मुकेश खोमणे, सुहास खोमणे यांच्यासह ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, महिला पदाधिकारी, कार्यकारी सदस्य आणि स्थानिक समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.




