जेजुरी प्रतिनिधी – शाम जगताप
अठरा पगड बारा बलुतेदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने ज्येष्ठ समाजसेवक तथा श्री मार्तंड देव संस्थान, जेजुरीचे माजी प्रमुख व विद्यमान विश्वस्त मा. श्री. पोपटराव खोमणे यांचा विशेष सत्कार व अभिनंदन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज लिमिटेड, जेजुरी येथे सलग तिसऱ्यांदा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच विमुक्त घुमंतू जनजाती विकास परिषद, अखिल भारतीय महाराष्ट्र प्रदेश या राष्ट्रीय सामाजिक संघटनेच्या सहकार्यवाहपदी निवड झाल्याबद्दलही त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
समाजकारण, धार्मिक कार्य, संघटन बांधणी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत राहून समाजाला दिशा देणाऱ्या पोपटराव खोमणे यांच्या कार्याचा गौरव म्हणून हा सत्कार आयोजित करण्यात आला. विविध सामाजिक, धार्मिक व औद्योगिक क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.
हा सत्कार अठरा पगड बारा बलुतेदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब भांडवलकर, प्रदेशाध्यक्ष राहुल काका भोंडे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नारायण मामा जाधव, महाराष्ट्र राज्य सदस्य बाळासाहेब जरांडे आणि पुणे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख शामराव जगताप यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
यावेळी महिला प्रदेशाध्यक्षा सुजाताई गुरव, पुणे जिल्हा महिला अध्यक्षा राणी भंडलकर, पुरंदर तालुका महिला अध्यक्षा मयुरी जरांडे, पुरंदर तालुका उपाध्यक्ष सोनाली दोडके, जेजुरी शहर महिला अध्यक्षा योगिता मोरे, सचिव कविता भोंडे, खजिनदार वैशाली सोनवणे, जेजुरी कार्याध्यक्ष रोहिणी खुडे, नीलम मोरे, वंदना मोरे, प्रज्ञा भोसले, शहराध्यक्ष सचिन कुंभार, जेजुरी शहर सचिव गणेश चव्हाण, जानू आप्पा दोडके, सुखदेव मोरे, सिताराम दोडके, दत्ता सकट, नवनाथ खोमणे, सचिन आढाळगे, जय साळुंखे, अजय भिसे, मच्छिंद्र बडे, धनाजी खुडे, संतोष साळुंखे, विजय जाधव, वैभव बारभाई, श्रीकांत दोडके, मच्छिंद्र घोडके, जालिंदर भंडलकर, पप्पू भिसे, संतोष जाधव, मनोज पोळ, कौशल्य खुडे, सचिन दोडके, अनंता भंडलकर, मुकेश खोमणे, सुहास खोमणे, नानासाहेब खोमणे यांच्यासह ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, महिला पदाधिकारी, कार्यकारी सदस्य आणि स्थानिक समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी पोपटराव खोमणे यांच्या कार्याचा गौरव करताना, समाजहित, धार्मिक सेवा, संघटनात्मक नेतृत्व आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत त्यांनी केलेले कार्य प्रेरणादायी असल्याचे सांगितले. त्यांच्या पुढील सामाजिक आणि संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा देत उपस्थितांनी त्यांच्या कार्याला सलाम केला.




