भाजप पुरस्कृत नगरसेवक रोहित पाटील यांचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र अवैध ठरले

दौण्ड प्रतिनिधी – महेंद्र माधवे 

 

दौंड नगरपरिषदेतील भाजप पुरस्कृत व नागरीहित संरक्षण मंडळाचे प्रभाग क्रमांक ४ चे नगरसेवक रोहित पाटील यांचे नगरसेवक पद धोक्यात आले असून, त्यांच्या कुणबी जातीच्या प्रमाणपत्राला जिल्हा जात पडताळणी समितीने अवैध ठरविले आहे. या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रोहित पाटील यांनी निवडणुकीनंतर नियमानुसार सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अपेक्षित होते. त्यांनी त्यासाठी अर्ज केला होता. मात्र, या प्रकरणात विविध स्तरांवर सुनावण्या झाल्यानंतर दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून समितीने अंतिम निर्णय दिला.

दौंडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेले कुणबी प्रवर्गाचे प्रमाणपत्र (क्र. 41955572016, दिनांक 12 नोव्हेंबर 2025) समितीने अवैध ठरवून रद्द केले आहे.

या प्रकरणी अॅड. सुशांत वाघमारे, सचिन कुलथे (मनसे शहराध्यक्ष), अनिकेत भागवत, रतन जाधव (दौंड) व मृणाल ढोले पाटील (पुणे) यांनी समितीकडे याचिका दाखल केली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर हा निकाल लागला असल्याचे सांगितले जाते.

या निर्णयामुळे भाजप व नागरीहित संरक्षण मंडळाच्या नगरपरिषदेत असलेल्या संख्याबळात एकाने घट होण्याची शक्यता असून, आगामी राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *