दौण्ड प्रतिनिधी – महेंद्र माधवे
पुणे ते साईनगर शिर्डी या महत्त्वाच्या धार्मिक मार्गावर नवीन एक्सप्रेस रेल्वे सेवा सुरू झाल्याने साईभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या नव्या गाडीचे स्वागत दौंड येथील कोर्डलाईन रेल्वे स्थानकावर दि. 17 जून 2026 रोजी दुपारी 4 वाजता करण्यात आले.
दौंड नगरपालिकेच्या नगराध्यक्षा कु. दुर्गादेवी जगदाळे व इंद्रजित जगदाळे यांच्या हस्ते या गाडीचे औपचारिक स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी या रेल्वे सेवेचे स्वागत करत, ही सेवा भाविकांसाठी वरदान ठरणार असल्याचे मत व्यक्त केले.
नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांनी आपल्या भाषणात रेल्वे प्रशासनाचे आभार मानले. त्यांनी पुढे सांगितले की, “दौंड आणि परिसरातील प्रवाशांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार असून, स्थानकावर स्वच्छता, पिण्याचे पाणी, आसनव्यवस्था आदी मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.”
या कार्यक्रमास उपनगराध्यक्षा छाया थोरात, नगरसेवक, नगरसेविका, रेल्वे अधिकारी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




