*जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक*
पुणे प्रतिनिधी
विवेकानंद फंड
आज दिनांक १५ जून २०२६ रोजी शाळा जगतापवाडी येथे नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात अत्यंत उत्साहात आणि आनंदमय वातावरणात झाली. शाळेचा परिसर स्वच्छ व नीटनेटका करून, आकर्षक स्वागत फलकांनी आणि रांगोळीने सजवण्यात आला.
इयत्ता पहिलीच्या वर्गात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शाळेतर्फे मोठ्या उत्साहात ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये मिरवणूक काढून,फुगे,आकर्षक टोप्या, गुलाब पुष्प देऊन, औक्षण केले.पहिले पाऊल म्हणून पायांचा ठसा घेऊन स्वागत केले. प्रत्येक विद्यार्थ्याला शालेय पुस्तके व शाळेचा गणवेश देण्यात आला. विशेष उपक्रम अंतर्गत ‘माझी शाळा माझे झाड ‘ निमित्त प्रत्येक मुलाला एकेक रोप वाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठी पंचायत समिती सदस्य मा. मनोज चौधरी,सरपंच मा. संदीपनाना जगताप,ग्रामसेविका मा. मोनिका माझीरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा.सुभाष जगताप,उपाध्यक्ष मा.राजू शेंडगे , शा.व्य.समिती सदस्य प्रीतम शिंदे,बाबासो बिचकुले,प्रदीप गायकवाड,अतुल जगताप ,ज्येष्ठ मार्गदर्शक आबा जगताप, पुनाजी कोतवाल ,स्वप्निल यादव,गणेश टुले महिला पालक वर्ग,युवा कार्यकर्ते साहिल जगताप, प्रणव कोतवाल,अंगणवाडी सेविका व कर्मचारी उपस्थित होते. दुपारच्या भोजनामध्ये मसालेभात बुंदी व जिलेबी वर मुलांनी यथेच्छ ताव मारला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिना म्हसे यांनी केले तर आभार मधुबाला वेताळ यांनी मानले.




