पहिल्याच पावसात कार पलटी; सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप

पहिल्याच पावसात कार पलटी; सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप

 

कळमेश्वर प्रतिनिधी

 

पावसाळ्याच्या सुरुवातीलाच रस्ते निसरडे झाल्याने आज कळमेश्वर–14 मैल रोडवरील सेलू टोल नाक्याजवळ एक चारचाकी वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटी झाल्याची घटना घडली. या अपघातात वाहनाचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

 

मिळालेल्या माहितीनुसार, पावसामुळे रस्ता ओला व निसरडा झाल्याने वाहन चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाले. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी व प्रवाशांनी तात्काळ मदतकार्य केले.

 

अपघातग्रस्त वाहनातील सर्व प्रवासी सुखरूप असून कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. पहिल्याच पावसात रस्त्यांवर घसरडेपणा वाढल्याने वाहन चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून सावधगिरीने वाहन चालवावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

 

पहिल्या पावसामुळे रस्ते निसरडे होत असल्याने वाहन चालकांनी सुरक्षित अंतर राखून व मर्यादित वेगाने वाहन चालविणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *