बाभुळसर बुद्रुक येथे वारकरी सेवा संघाच्या तसेच विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा नागरी सन्मान

बाभुळसर बुद्रुक येथे वारकरी सेवा संघाच्या तसेच विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा नागरी सन्मान

अल्लाउद्दीन अलवी  प्रतिनिधी 

ता.बाभुळसर बुद्रुक तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील सुपुत्र, शिरूर तालुका वारकरी सेवा संघाचे संपर्कप्रमुखपदी रामदास विनायक नागवडे नेते यांची निवड झाल्याबद्दल, तसेच बाभुळसर बुद्रुक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था चेअरमनपदी मंदाकिनी अंकुश नागवडे , व्हा.चेअरमनपदी अंकुश दशरथ मचाले यांची निवड झाल्याबद्दल , तसेच संत तुकाराम विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या व्हा.चेअरमनपदी अमोल राजेंद्र नागवडे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच दिपालीताई महेंद्र नागवडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये ग्रामपंचायत सदस्या मनीषाताई सोमनाथ नागवडे, संत तुकाराम विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे मा. चेअरमन बाळासाहेब ढमढेरे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस युवक उपाध्यक्ष महेंद्र हनुमंत नागवडे , माजी चेअरमन मनोहर मचाले,माजी संचालक अशोक गवळी, मा.व्हा चेअरमन अंकुश आबा नागवडे, अल्लाउद्दीन अलवी उपाध्यक्ष पुणे जिल्हा द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य, जेष्ठ विठ्ठल तात्या नागवडे,हरिभाऊ नागवडे रयत क्रांती प्रवक्ते, निवृत्त अधिकारी सगाजी नागवडे, सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ नागवडे, अमित नागवडे संगणक परिचालक,उद्योजक लक्ष्मण टेकवडे,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समिती सदस्य संतोष नागवडे, संतोष नागवडे, मा संचालक बाळासाहेब थोरात, माजी चेअरमन मारुती नागवडे, मृदुंगमणी ह भ प संपत नागवडे, मोहन नागवडे,सल्लाउद्दीन अलवी , दम्या भोसले आदी बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना सरपंच दिपालीताई नागवडे यांनी आपल्या मनोगतामध्ये या सर्व पदाधिकाऱ्यांनी संस्थेचा कारभार पाहत असताना सभासदाचे हित लक्षात घेता निस्वार्थी आणि स्वच्छ कारभार करणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगितले.तसेच मंदाकिनी अंकुश नागवडे यांनी बोलताना सांगितले की सभासदांनी बँक पातळीवर,संस्था पातळीवर वेळेवर वसून देऊन सभासदांना डिव्हीडंड वाटता यावा यासाठी आमचे संचालक मंडळ कार्यरत असल्याचे बाभुळसर बुद्रुक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन मंदाकिनी नागवडे यांनी सांगितले. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अल्लाउद्दीन अलवी यांनी केले तर आभार अंकुश आबा नागवडे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *