*ऑल इंडिया पॅथर सेना पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदावर प्रा. सदाशिव कांबळे यांची निवड*
*राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांचे हस्ते उरुळी कांचन येथे नियुक्ती पत्र प्रदान*

दौंड तालुका प्रतिनिधी हवेली । उरुळी कांचन शुक्रवार, दि. १७ एप्रिल, २०२६ रोजी उरुळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे येथे ऑल इंडिया पॅथर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांचे हस्ते संघ नायक न्यूजचे संपादक प्रा. सदाशिव कांबळे यांची ‘ऑल इंडिया पॅथर सेना पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख’ पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रा. सदाशिव कांबळे यांचेकडे असलेला अनुभव तसेच आंबेडकरी बहुजन समाजासाठी दिलेले योगदान लक्षात घेऊन, संघटनेची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. पुणे जिल्ह्यात नव्याने बांधणी करुन, पॅथरची ताकद वाढवा तसेच सामाजिक, राजकीय व आर्थिक प्रश्नांवर ठाम भूमिका घेऊन लढाल आणि बहुजन समाजाचा आवाज बुलंद कराल असा विश्वास राष्ट्रीय अध्यक्ष केदार यांनी व्यक्त केला. पुढील वाटचालीसाठी आणि कार्यासाठी प्रा. सदाशिव कांबळे यांस राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी हार्दिक शुभेच्छा देत अभिनंदन केले.
याप्रसंगी नियुक्ती पत्र देताना युवक आघाडी विदर्भ अध्यक्ष संकेत जाधव, दौंड तालुका उपाध्यक्ष किरण जाधव, समाज सेवक मच्छिंद्र जाधव, मिलिंद जाधव, संघ नायक न्यूज पुणे जिल्हा समन्वयक आदिनाथ सरवदे, उरुळी कांचन गट प्रतिनिधी शंकर जराड यांची प्रमुख उपस्थिती होती.
दौंड तालुका प्रतिनिधी विकास साळुंके आर जे न्यूज २७ मराठी साठी




