“कै. रामचंद्र जरांडे स्मृतिदिनानिमित्त अनाथ मुलांसाठी खाऊ वाटप; सासवडमध्ये सामाजिक उपक्रम”

 

प्रतिनिधी – शामराव जगताप 

कै. रामचंद्र जरांडे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त सासवड (ता. पुरंदर) येथे श्री संत सोपानकाका आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था सासवड येथे अठरा पगड बारा बलुतेदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अनाथ व गरजू मुलांना खाऊ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

यावेळी संत सोपानकाका अध्यात्मिक वारकरी संस्था संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य ह.भ.प. गणेशजी महाराज वाघले उपस्थित होते. ही संस्था गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने मुलांना वारकरी संप्रदायाचे आध्यात्मिक शिक्षण देत आहे. पुरंदर तालुक्यातील पहिली वारकरी शिक्षण संस्था म्हणून या संस्थेची सर्वत्र ओळख आहे.

तीर्थक्षेत्र आळंदी येथे जसे आध्यात्मिक शिक्षण मिळते, तसेच शिक्षण ब्रह्ममूर्ती श्री संत सोपानकाकांच्या संजीवन समाधी असलेल्या सासवड नगरीत मिळावे, हा उदात्त हेतू समोर ठेवून संस्था कार्यरत आहे.

संस्थेमध्ये विविध तालुक्यांतील विद्यार्थी वास्तव्यास असून, गरीब तसेच अनाथ मुलांचा देखील येथे सांभाळ केला जातो. संस्थेने अनेक कीर्तनकार, प्रवचनकार आणि मृदंगाचार्य घडवले आहेत. शालेय शिक्षणाबरोबरच वारकरी शिक्षण देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य संस्था करत आहे.

हा कार्यक्रम अठरा पगड बारा बलुतेदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट, महाराष्ट्र राज्य सदस्य बाळासाहेब जरांडे, पुरंदर तालुका महिला अध्यक्षा मयूरी जरांडे, रुद्र जरांडे, सई जरांडे, यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमास ह.भ.प. ओमकार महाराज टिमगिरे, संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब भांडवलकर, राज्य सल्लागार मंगेश गायकवाड, मार्गदर्शक दिलीप गुरव, राज्य युवक अध्यक्ष दत्तात्रय सूर्यवंशी, पुणे जिल्हा युवक अध्यक्ष समीर मुलाणी, पुरंदर तालुका उपाध्यक्ष राहुल पवार, तसेच इतर मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *