NSSE परीक्षेत कळसकरवाडी जिल्हा परिषद शाळेची चमकदार कामगिरी

NSSE परीक्षेत कळसकरवाडी जिल्हा परिषद शाळेची चमकदार कामगिरी

राज्य गुणवत्ता यादीत ५ तर जिल्हा गुणवत्ता यादीत ५ विद्यार्थी; एकूण १० विद्यार्थ्यांचा गौरव
प्रतिनिधी – अल्लाउद्दीन अलवी 
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता पुन्हा एकदा अधोरेखित करत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळसकरवाडी येथील विद्यार्थ्यांनी नॅशनल स्कॉलर सर्च परीक्षा (NSSE) मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परीक्षेत शाळेच्या विद्यार्थ्यांनी राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवत शाळेचे आणि परिसराचे नाव उज्ज्वल केले आहे.
या यशाबद्दल शाळेत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला. या समारंभात शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
राज्य गुणवत्ता यादीतील विद्यार्थी :
शिवराज योगेश पाचपुते (इयत्ता १ ली) – राज्यात १९ वा,
शौर्य गणेश कळसकर (इयत्ता ३ री) – राज्यात ४ था,
स्वराज नाना कळसकर (इयत्ता ३ री) – राज्यात ६ वा,
सोहम संजय कळसकर (इयत्ता ३ री) – राज्यात १० वा,
अथर्व रामदास कळसकर (इयत्ता ४ थी) – राज्यात १५ वा.
जिल्हा गुणवत्ता यादीतील विद्यार्थी :
ऋषिकेश ज्ञानेश्वर पाचपुते (इयत्ता ३ री) – जिल्ह्यात २ रा,
विनय आशिष सरकटे (इयत्ता ३ री) – जिल्ह्यात ७ वा,
अनन्या संजय कळसकर (इयत्ता ३ री) – जिल्ह्यात ८ वा,
अक्षदा रवींद्र कळसकर (इयत्ता ४ थी) – जिल्ह्यात १ ली,
प्रद्युम नवनाथ बनकर (इयत्ता ४ थी) – जिल्ह्यात २ रा.
या सर्व विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास, चिकाटी आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनातून हे यश मिळवले आहे. शाळेचे मुख्याध्यापक मोहन आनोसे आणि उपक्रमशील शिक्षिका मीनाक्षी आनोसे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी विशेष मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगेश पाचपुते होते. यावेळी तांदळी गावचे माजी उपसरपंच लक्ष्मण नाना कळसकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रविंद्र कळसकर, डॉ. संजय कळसकर, रामदास कळसकर, नाना कळसकर, महावीर शेठ मुनोत, नवनाथ बनकर, अशोक थोरात, तसेच महिला पालक रेखा कळसकर, वैशाली कळसकर, शुभांगी कळसकर आदी उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत भविष्यातही अशाच प्रकारे परिश्रमपूर्वक अभ्यास करून मोठ्या स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवावे, असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना छोटेखानी बक्षिसे देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *