येणारे नवरात्र व दिवाळी उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी यवत पोलीस ठाण्यांतर्फे केडगाव बाजारपेठेत रोड मार्शल फेरी

येणारे नवरात्र व दिवाळी उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी यवत पोलीस ठाण्यांतर्फे केडगाव बाजारपेठेत रोड मार्शल फेरी

केडगाव (ता. दौंड) – पुणे ग्रामीण पोलीस यांच्या अधिपत्याखाली यवत पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या केडगाव बाजारपेठेत आज रोड मार्शल फेरी काढण्यात आली. येऊ घातलेल्या नवरात्र महोत्सव व दिवाळी उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच सामाजिक सलोखा टिकून राहावा, या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली.

यवत पोलीस स्टेशनचे कार्यक्षेत्र विस्तीर्ण असल्याने, येणाऱ्या उत्सवांदरम्यान कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे सांगण्यात आले. पोलिस अधीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या रोड मार्शल फेरीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये पोलीस दलाने बाजारपेठ व प्रमुख मार्गांवरून फेरी काढत नागरिकांशी संवाद साधला व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आवाहन केले.

पोलीस प्रशासनाने नागरिकांना उत्सव साजरे करताना शांतता व एकोपा जोपासण्याचे आवाहन केले असून, कुठल्याही प्रकारचे गैरवर्तन सहन केले जाणार नसल्याचा इशाराही देण्यात आला आहे. “येणारे सण उत्साहात पण गुण्यागोविंदाने पार पडले पाहिजेत” असा संदेश यावेळी देण्यात आला.


आरजे न्यूज 27 मराठी
दौंड तालुका प्रतिनिधी – विकास साळुंके

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *