रोटरी क्लब ऑफ शिक्रापूर तर्फे “नेशन बिल्डर अवॉर्ड” जाहीर
शिरूर तालुक्यातील २१ गुणवंत शिक्षकांचा सन्मान – गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर यांना विशेष गौरव

शिक्रापूर –
शिरूर तालुक्यातील आदर्श शैक्षणिक कार्य करणाऱ्या २१ गुणवंत शिक्षकांचा रोटरी क्लब ऑफ शिक्रापूर तर्फे “नेशन बिल्डर अवॉर्ड २०२५” जाहीर करण्यात आला आहे. शिक्रापूर रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. संजय तांबे व सचिव रो. शिरीषकुमार हार्दे यांनी पत्रकारांना ही माहिती दिली

या उपक्रमाचे यंदा बारावे वर्ष असून, प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या निष्ठावान सेवेला गौरविण्याचा हेतू यामागे आहे. शैक्षणिक क्षेत्रात शिरूर तालुका राज्यात अग्रेसर मानला जातो. याच पार्श्वभूमीवर शिरूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर यांना “शिक्षण कार्य तपस्वी” हा विशेष सन्मान जाहीर करण्यात आला आहे.

पुरस्कारप्राप्त शिक्षक
प्राथमिक विभाग (१०)
सुनिता जगताप (रामलिंग)
मधुमालिनी गोडसे (शिक्रापूर)
बिभीषण गांजे (कोयाळी पुनर्वसन)
संतोष पवार (जातेगाव बु.)
सारिका कदम (इनामगाव)
गीतांजली वाघोले (वाबळेवाडी)
वैशाली थिटे (पर्हाडवाडी)
मनोज वाबळे (तळेगाव ढमढेरे)
प्रतिभा म्हस्के (बाभुळसर बु.)
योगेश भोस (बुरुंजवाडी)
माध्यमिक विभाग (११)
संगीता कदम (नागरगाव)
सुनील जाधव (जांबुत)
मोहन ओमासे (तळेगाव ढमढेरे)
चुनीलाल पाटील (निमोणे)
अश्विनी घारू (शिरूर)
गणेश मांढरे (शिक्रापूर)
प्रशांत वाळुंज (मांडवगण फराटा)
सुभाष ढमढेरे (करंजावणे)
संदीप तानवडे (शिरूर)
रामदास भोर (गणेगाव खालसा)
प्रशांत गलांडे (केंदूर)
अभिनंदन
पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे अभिनंदन रो. वीरधवल करंजे, रो. डॉ. मिलिंद भोसुरे, रो. लधाराम पटेल, रो. मयूर करंजे, रो. विठ्ठल वाघ, रो. संजीव मांढरे यांनी केले आहे.
या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून रो. मनोहर परदेशी (माध्यमिक विभाग) व रो. राहुल चातुर (प्राथमिक विभाग) यांनी काम पाहिले






