देऊळगावराजे येथे जुगार अड्ड्यावर दौंड पोलिसांचा छापा; पाच जणांवर गुन्हा, २१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

देऊळगावराजे येथे जुगार अड्ड्यावर दौंड पोलिसांचा छापा; पाच जणांवर गुन्हा, २१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी – विकास साळुंके 

दौंड : तालुक्यातील मौजे देऊळगावराजे येथे रमीचा जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर दौंड पोलिसांनी छापा टाकून पाच जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये कारवाई केली. या कारवाईत रोख रक्कम, पत्त्यांचे दोन कॅट, पेन आणि विविध कंपन्यांचे मोबाईल फोन असा एकूण २१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी सुमारे ३.५० वाजण्याच्या सुमारास देऊळगावराजे गावाच्या हद्दीत फॉरेस्टच्या पाठीमागील परिसरात ही कारवाई करण्यात आली. संबंधित ठिकाणी काही व्यक्ती रमीचा जुगार खेळत व खेळवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली असता संशयित व्यक्ती जुगार खेळताना आढळून आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

 

या प्रकरणी पुरुषोत्तम गणेश साळुंके (वय २२), अमोल विलास जगताप (वय ४०), हणुमंत सुखदेव काळे (वय ५८), रोहित अंबादास खुडे (वय २७) आणि सुरज सिताराम गायकवाड (वय ३२) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

या कारवाईदरम्यान पोलिसांनी रोख रक्कम, ५२ पत्त्यांचे दोन कॅट, दोन पेन तसेच विविध कंपन्यांचे मोबाईल फोन असा एकूण २१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.

 

याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ६२३/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई गोरख बाबासाहेब हजारे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.

 

दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार म्हेत्रे करीत असून, दाखल अंमलदार म्हणून पोलीस नाईक रोटे यांनी कामकाज पाहिले आहे. जुगारविरोधी कारवाईमुळे परिसरातील अवैध जुगाराच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून कारवाई सुरू असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *