समाजसेवेपासून परमार्थिक सेवेकडे किर्तीताई साकोरे यांची नवी वाटचाल

समाजसेवेपासून परमार्थिक सेवेकडे किर्तीताई साकोरे यांची नवी वाटचाल

निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या शिरूर तालुका महिला संपर्कप्रमुखपदी नियुक्ती

सणसवाडी प्रतिनिधी:-सीमाताई पवार

(ता. शिरूर, जि. पुणे) : पतीच्या निधनानंतर खचून न जाता सामाजिक बांधिलकी जपत समाजसेवेचा वसा पुढे नेणाऱ्या आशा सेविका ह.भ.प. किर्तीताई संतोष साकोरे यांच्या कार्याची दखल घेत त्यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या शिरूर तालुका महिला संपर्कप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल विविध स्तरांतून अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील परमार्थिक कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

किर्तीताई साकोरे या सन २००९ पासून आशा सेविका म्हणून कार्यरत असून, ग्रामीण भागातील माता-बाल आरोग्य, लसीकरण, आरोग्य जनजागृती, शासकीय आरोग्य योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणे आदी विविध माध्यमातून त्या सातत्याने सेवा बजावत आहेत. आरोग्यविषयक जनजागृतीबरोबरच सामाजिक कार्यातही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.

पतीच्या निधनानंतर जीवनात आलेल्या कठीण प्रसंगाला धैर्याने सामोरे जात त्यांनी आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळत समाजसेवेचा मार्ग सोडला नाही. ‘जीवनात आलेल्या संकटांवर मात करून समाजासाठी काहीतरी चांगले करण्याची प्रेरणा प्रत्येकाने घ्यावी,’ हा संदेश त्यांच्या कार्यातून दिसून येतो. त्यांच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी जीवनप्रवासामुळे अनेक महिलांना तसेच समाजातील नागरिकांना सकारात्मक प्रेरणा मिळत आहे.

आरोग्यसेवेबरोबरच आध्यात्मिक व परमार्थिक क्षेत्रातही योगदान देण्याची त्यांची असलेली तळमळ लक्षात घेऊन निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेने त्यांच्यावर शिरूर तालुक्यातील महिला संपर्काची महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे. या माध्यमातून महिला कीर्तनकार, वारकरी, भक्तगण तसेच समाजातील महिलांना एकत्र आणून आध्यात्मिक, सामाजिक आणि संस्कारक्षम उपक्रमांना चालना देण्याचा त्यांचा मानस आहे.

ह.भ.प. किर्तीताई संतोष साकोरे, रा. मु.पो. केंदूर, ता. शिरूर, जि. पुणे यांची ही नियुक्ती त्यांच्या आजवरच्या सामाजिक कार्याचा सन्मान मानली जात आहे. आरोग्यसेवा आणि अध्यात्मिक सेवा या दोन्ही क्षेत्रांचा सुंदर संगम साधत त्या भविष्यातही समाजासाठी उल्लेखनीय कार्य करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

नियुक्तीबद्दल हार्दिक अभिनंदन!

निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या शिरूर तालुका महिला संपर्कप्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल ह.भ.प. किर्तीताई संतोष साकोरे यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील परमार्थिक कार्यास कोटी कोटी शुभेच्छा!

संपादक - रमेश मनोहर बनसोडे
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे

जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *