पद्मश्री डॉ आप्पासाहेब पवार माध्यमिक विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन साजरा 

पद्मश्री डॉ आप्पासाहेब पवार माध्यमिक विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन साजरा

 

प्रतिनिधी -अल्लाउद्दीन अलवी

पुणे जिल्हा प्रतिनिधी ता.१५ मांडवगण फराटा, गणेगाव दुमाला, बाभुळसर बुद्रुक त्रिवेणी संगमावर विद्यालयाची सुसज्ज इमारत प्रयोगशाळा स्वच्छतागृह, निसर्ग रम्य वातावरणामध्ये पद्मश्री डॉ आप्पासाहेब पवार माध्यमिक विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी मंथन,NMMS, स्कॉलरशिप,N SSC परिक्षेत घवघवीत यश मिळवले म्हणून त्यांचा विद्यालयाच्या वतीने सन्मान परिक्रमा शैक्षणिक संकुल चे उपाध्यक्ष हनुमंत भाऊ पाटोळे, टाटा मोटर्सने महेंद्र मोटे साहेब यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपाचे जिल्हाध्यक्ष सचिन बापू मचाले, मा अध्यक्ष रमेश दादा पाटोळे,अध्यक्ष मनोहर मचाले उपाध्यक्ष अमोल नागवडे, बाभुळसर बुद्रुक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे संचालक शरद नागवडे, संचालक विलास गवळी,मा चेअरमन शरद मचाले, गणेगाव दुमाला मा उपसरपंच अमोल भोसले,पालक सदस्य महादेव मचाले,अजित गवळी, गणेश मचाले,शरद जगताप, कॉन्ट्रॅक्टर अमित मचाले, झाकीर सय्यद, मुख्याध्यापिका गावडे मॅडम सर्व शिक्षक कर्मचारी वृंद पालक, सदस्य, ग्रामस्थ व विद्यार्थी व विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी बोलतांना महेंद्र मोटे साहेब यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की विद्यार्थी घडत असताना शिक्षक पालक आणि व्यवस्थापन ही तितकच महत्त्वाचं असून विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर व्यायाम योगासन करणे गरजेचे असल्याचे यावेळी सांगितले. तसेच विद्यालयातील जडणघडण्यासाठी कोणतेही समस्या असो ते सोडवण्यासाठी माझा सिंहाचा वाटा असेल यावेळी त्यांनी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *